Advertisement

मोनो रेल 2 चा मुहूर्त लांबणीवर


 मोनो रेल 2 चा मुहूर्त लांबणीवर
SHARES

मुंबईकरांची मोनो रेलची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. मोनोची ट्रायल रन 15 ऑगस्टला पार पडली. 15 तारखेला वडाळा ते जेकब सर्कल या दुस-या टप्प्याची चाचणी यशस्वीपणे पार पडली. मोनोचा दुसरा टप्पा सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीनं ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया होती. ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानं आता नववर्षात मोनो सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. मोनोचा दुसरा टप्पा सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीनं ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया होती. ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानं आता नववर्षात मोनो सेवेत दाखल होण्याची शक्यता दाट झाली आहे. एमएमआरडीएकडून चाचणी पार पडल्यानंतर पाच दिवसांनी चाचणीची अधिकृत घोषणा केली आहे. आता मोनोच्या आणखी चाचण्या होतील. त्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर वडाळा ते जेकब सर्कल हा मोनोचा दुसरा टप्पा सेवेत दाखल होईल. दरम्यान ही सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना चेंबूर ते जेकब सर्कल असा प्रवास करता येणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा