Advertisement

वादग्रस्त ठरलेल्या मेट्रो तीनची मंगळवारी ट्रायल

वादग्रस्त ठरलेल्या कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरच्या मेट्रो 3 (Metro 3) ची मंगळवारी म्हणजेच उद्या ट्रायल होणार आहे.

वादग्रस्त ठरलेल्या मेट्रो तीनची मंगळवारी ट्रायल
SHARES

वादग्रस्त ठरलेल्या कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरच्या मेट्रो 3 (Metro 3) ची मंगळवारी म्हणजेच उद्या ट्रायल होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत मेट्रो ३ ची ट्रायल होणार आहे. आरेच्या सारीपुत नगर येथील ट्रॅकवरती ही चाचणी होणार आहे.

एकीकडे आरे कारशेडला पर्यावरणवाद्यांचा विरोध असताना दुसरीकडे मात्र ट्रायल सुरु करण्यात आली आहे. या मेट्रोसाठी दोन रॅक मुंबईत दाखल झाले आहेत. सकाळी 11 वाजता ही आरेच्या सारीपुत नगर येथील ट्रॅकवरती ही चाचणी होणार आहे.

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरील मेट्रो-3 चे मे 2021 अखेर पर्यंत भुयारीकरणाचे काम 96 टक्के पूर्ण झाले आहे. तर एकूण प्रकल्पाचे काम 67 टक्के झाले आहे. मात्र, कारशेडबाबत निर्णय झालेला नसल्याने मेट्रो-3 चे भवितव्य अंधारातच आहे. कारशेड निर्णयाच्या विलंबामुळे मेट्रो - 3 ची मुदत साधारण दोन-तीन वर्षे पुढे जाण्याची भीती आहे.

आरेतील मेट्रो 3 चं कारशेड कांजूरमार्ग इथं हलवण्याचा निर्णय होताच केंद्र सरकारनंही कांजूरमार्गच्या या जागेवर स्वतःचा मालकी हक्क दाखवला होता. सदर जागा ही मिठागराची असल्यामुळे त्यावर केंद्राचा अधिकार आहे असं नमूद करून त्यावर कोणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा बोर्ड लावला होता.



हेही वाचा

गणेशभक्तांच्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करा, CM एकनाथ शिंदेंचे आदेश

मुंबई एसी लोकल : प्रवाशांचा वाढता विरोध, अखेर रेल्वे प्रशासनाने घेतला 'हा' निर्णय

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा