Advertisement

गणेशभक्तांच्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करा, CM एकनाथ शिंदेंचे आदेश

महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीची मुख्यमंत्री शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेतली.

गणेशभक्तांच्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करा, CM एकनाथ शिंदेंचे आदेश
File photo
SHARES

गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या वाहनांसाठी मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील टोलनाक्यांवर स्वतंत्र मार्गिका करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

साताऱ्याहून मुंबईकडे परतताना मुख्यमंत्र्यांनी मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली (खालापूर) टोलनाक्याला भेट दिली. महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीची मुख्यमंत्री शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेतली.

सण-उत्सव, सुट्टय़ांच्या काळात या द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि पथकर नाक्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी मनुष्यबळ वाढवावे, सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

गणेशोत्सव, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोल नाक्यांवर ट्रॅफिक वॉर्डन, टोल वसूल करण्यासाठी स्कॅनिंग मशिन्सची संख्या वाढवावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महामार्ग पोलीस आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत दिले.

सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याकरिता तातडीने उपाययोजना हाती घ्याव्यात, असे सांगत वाहतूक कोंडीतून प्रवाशांना दिलासा देण्यासाठी यंत्रणेने जलदगतीने कार्यवाही करावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली़



हेही वाचा

कोकणात गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी, 'असा' मिळवा पास

यंदा मुंबईतल्या घाटकोपरमध्ये सर्वात जास्त गणपती पंडाल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा