मुलुंडकरांसाठी दिवाळी भेट

 Dalmia Estate
मुलुंडकरांसाठी दिवाळी भेट

मुलुंड - महाराष्ट्र एसटी महामंडळाकडून मुलुंडकरांसाठी गव्हाणपाडा ते पनवेल अशी बससेवा शुक्रवार धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्यात आली आहे. गव्हाणपाडापासून नंतर मुलुंड रेल्वे स्थानक, हनुमान चौक, टाटा कॉलनी, म्हाडा कॉलनी प्रवेशद्वार आणि नंतर इस्टर्न हाय-वेने व्हाया ठाणे बेलापूर रोडहून पनवेलपर्यंत ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. सकाळी 7 वाजता गव्हाणपाडाहून पहिली फेरी आणि नंतर दुपारी 12 च्या दरम्यान दुसरी फेरी असेल. दिवसभरात अशा दोन फेऱ्या असतील. जर प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाला तर या बस फेऱ्या वाढवण्यासंदर्भात विचार केला जाईल अशी माहिती एसटी महामंडळानं दिली आहे.

Loading Comments