...आणि त्या प्रवाशाचा जीव थोडक्यात वाचला!

  मुंबई  -  

  चालत्या लोकल ट्रेनमध्ये चढणे किंवा उतरणे जीवघेणे ठरू शकते, ही बाब प्रत्येक प्रवाशाला माहीत असते. तरीही प्रवासी चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा किंवा त्यात चढण्याचा हमखास प्रयत्न करताना दिसतात. दुर्दैवाने काही प्रवाशांना गंभीर अपघात होतो, तर काही प्रवासी थोडक्यात वाचतात. असाच एक प्रकार नुकताच कुर्ला रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

  सीएसटीहून कल्याणकडे निघालेली ट्रेन कुर्ला स्थानकात येताच एका प्रवाशाने चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान त्याचा पाय घसरल्याने तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील गॅपमध्ये अडकला. हा प्रकार पाहून काही प्रवाशांनी त्याला प्रसंगावधान दाखवत तात्काळ वर खेचल्याने या प्रवाशाचा जीव वाचला. या प्रकाराने प्लॅटफॉर्मवरील आणि ट्रेनमधील प्रवाशांमध्ये काही काळ घबराट उडाली होती.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.