Advertisement

माथेरान मिनी ट्रेनच्या आता रोज १२ फेऱ्या


माथेरान मिनी ट्रेनच्या आता रोज १२ फेऱ्या
SHARES

नोव्हेंबर महिना हा थंडीचा महिना असून, या दिवसात थंडीचा आनंद लुटण्यासाठी अनेकजण सहलीला जातात. तसंच, अनेकजण माथेरानला जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाही माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळ माथेरानला येणाऱ्या पर्यटकांसाठी सोमवार २२ नोव्हेंबरपर्यंत मिनीट्रेनच्या रोज १२ फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

सध्या अमन लॉज ते माथेरानदरम्यान मिनीट्रेनच्या रोज ४ आणि शनिवार-रविवारी रोज ८ शटल सेवा धावत आहेत. वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे ४ शटल सेवा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची अमंलबजावणी तातडीने होईल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. वसूबारस ते भाऊबीज या काळात २,५०० हून अधिक प्रवासी आणि पर्यटकांनी मिनीट्रेन सफरीच आंनद घेतला. या पर्यटकांच्या माध्यमातून रेल्वेने पावणे दोन लाखांच्या आसपास कमाई केली आहे.

मिनी ट्रेन ही माथेरानला येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. येथे येणारे पर्यटक मिनी ट्रेनमधून प्रवासाचा आनंद आवर्जून घेतात. इतर वाहतूक सुविधांच्या तुलनेत खर्चाच्या दृष्टीने देखील मिनी ट्रेन परवडणारी आहे. त्यामुळं पर्यटक मिनी ट्रेनला प्राधान्य देतात. कोरोनापूर्व काळात मिनी ट्रेनच्या सोमवार ते शुक्रवार ८ अप-८ डाऊन आणि शनिवार-रविवारी १० अप आणि १० डाऊन फेऱ्या चालवण्यात येत होत्या. 

अनलॉकमध्ये पर्यटन क्षेत्र सुरू झाले आहे. तसेच दिवाळनिमित्त अनेकजण सहकुटुंब फिरायला बाहेर पडले होते. मुंबई-पुण्यापासून एक दिवसाच्या सहलीसाठी माथेरानला प्रथम पसंती दिली जाते. यामुळे रेल्वे प्रशासनाने फेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी विनंती माथेरानवासीयांकडून करण्यात आली होती. ती मान्य झाली लवकरच सेवा पूर्ववत होईल, अशी आशा आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा