Advertisement

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी टाटा कंपनीशी चर्चा

आर्थिक समस्यांमध्ये वाढ झाल्यानं बेस्ट उपक्रमानं काही महिन्यांसाठी कर्मचाऱ्यांना पगार उशिरानं देण्यासाठी औद्योगिक न्यायालयाकडून परवानगी घेतली होती. मात्र, या सर्व परिस्थितीत बेस्ट उपक्रमानं कर्मचाऱ्यांना पगार वेळेत मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना सोमवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी टाटा कंपनीशी चर्चा
SHARES

आर्थिक तोटा सहन करणाऱ्या बेस्ट प्रशासनाला कर्मचाऱ्यांना पगार वेळेत देणं कठीण होत आहे. कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्यानं त्यांच्या आर्थिक समस्यांमध्ये वाढ झाली आहे. मागील काही महिन्यांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत नाही. आर्थिक समस्यांमध्ये वाढ झाल्यानं बेस्ट उपक्रमानं काही महिन्यांसाठी कर्मचाऱ्यांना पगार उशिरानं देण्यासाठी औद्योगिक न्यायालयाकडून परवानगी घेतली होती. मात्र, या सर्व परिस्थितीत बेस्ट उपक्रमानं कर्मचाऱ्यांना पगार वेळेत मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना सोमवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे.


दररोज सुमारे ८० कोटी उत्पन्न 

दररोज बेस्टला विद्युत विभागाकडून आणि वाहतुक विभागाकडून सुमारे १८ कोटी रुपये उत्पन्न मिळतं. तसंच, पंधरवड्यात बेस्टला २७० कोटी रुपये उत्पन्न जमा होतं. मात्र, प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला बेस्ट उपक्रमाकडून टाटा कंपनीला विजेची रक्कम दिली जाते. त्यामुळं बेस्टकडं जमा झालेल्या उत्पन्नातील सर्वात मोठा वाटा टाटा वीज कंपनीकडून घेतल्या जाणाऱ्या विजेची रक्कम देण्यासाठी दिला जातो. 


टाटा कंपनीसोबत चर्चा

उत्पन्नातील सर्वात मोठा वाटा टाटा कंपनीला दिल्यानं कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न उपस्थित होतो. यावर पर्याय म्हणून बेस्टनं सोमवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत टाटा कंपनीसोबत चर्चा करून विजेच्या रकमेतील ५० टक्के १ ते १५ तारखेपर्यंत आणि उर्वरित ५० टक्के रक्कम १५ ते ३० तारखेपर्यत देण्यास मान्यता घेण्याचा प्रस्ताव ठेवता येईल. या प्रस्तावामुळं बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पगार वेळेक देता येईल, अशी सूचना करण्यात आली आहे.



हेही वाचा -

आमदार कालिदास कोळंबकर करणार यूतीचा प्रचार

मुंबईच्या समुद्रात महाराजा जहाजाला आग- चिफ इंजिनीअरचा मृत्यू



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा