Advertisement

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, तर परेचा नाईटब्लॉक


मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, तर परेचा नाईटब्लॉक
SHARES

मध्य रेल्वेवर नेहमीप्रमाणे या रविवारीही मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मेन लाइनवर दिवा ते कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.

ब्लॉकदरम्यान दिवा ते कल्याण स्थानकादरम्यानची डाउन जलद मार्गावरील वाहतूक डाउन धिम्या मार्गावरुन चालवण्यात येणार आहे. त्यामुळे डाउन जलद मार्गावरील लोकल गाड्या सुमारे २० मिनिटे उशिराने धावणार आहेत.

सीएसएमटीसाठी ठाणे स्थानकातून अप जलद मार्गावर सुटणाऱ्या सर्व लोकल गाड्यांना सकाळी १०.३७ ते दुपारी ३.०६ वाजेपर्यत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांत थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे या लोकल गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत.

तसेच, ब्लॉकदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ५ वाजेपर्यत सीएसटीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या धिम्या मार्गावरील लोकल गाडया १० मिनिटे उशिराने धावणार आहेत.


हार्बर मार्गावर इथे असणार मेगाब्लॉक

हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

हार्बर मार्गावर सकाळी ९.५३ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे वाशी, बेलापूर आणि पनवेलसाठी लोकल धावणार नाहीत.

तसेच, सीएसएमटी ते वांद्रे-अंधेरी दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सकाळी ९.५६ ते दुपारी ५.०९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून पनवेलकरीता स्पेशल लोकल चालवण्यात येणार आहे.

रविवारी हार्बर मार्गावरील प्रवासी मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत प्रवास करू शकतात.


पश्चिम रेल्वेचा नाईटब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर शुक्रवारी रात्री सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर आणि पाचव्या रेल्वे मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.

रात्री ११.३० ते पहाटे ३.३० वाजेपर्यत ही दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉक दरम्यान गोरेगाव ते सांताक्रुझ दरम्यान अप जलद मार्गावरील लोकल अप धिम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहेत.

तसेच डाउन मार्गावरील मेल-एक्सप्रेस गाड्या डाउन जलद मार्गावरुन चालविण्यात येणार आहेत.



हेही वाचा

रेल्वे अपघातांना तारांचं 'कुंपण'!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा