Advertisement

रेल्वे अपघातांना तारांचं 'कुंपण'!


रेल्वे अपघातांना तारांचं 'कुंपण'!
SHARES

उपनगरीय रेल्वेमार्गावर शॉर्टकट मारण्याच्या नादात जीव धोक्यात घालून रूळ ओलांडण्याच्या तरूणांच्या वाढत्या प्रमाणामुळे रेल्वे अपघातातील बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

मध्य रेल्वेच्या हद्दीत यंदाच्या वर्षी ऑगस्टपर्यंत 744 तर पश्चिम रेल्वेवर 369 अशा एकूण 1113 जणांचा जीव गेला आहे. त्यामुळे रेल्वे मार्गात अनधिकृतपणे प्रवेश देणाऱ्या सहा धोकादायक चोरवाटांवर तारांची कुंपणे उभारण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

त्यामुळे अशा असुरक्षित ठिकाणांवर मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या माध्यमातून एमयुटीपी - ३ अंतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या एकूण 22 ठिकाणी ‘ट्रेस पासिंग कंट्रोल’ अंतर्गत 551 कोटी रूपये खर्च करून पादचारी पुल उभारणे, तटबंदी बांधणे, कुंपण बांधणे यासारखे उपक्रम राबवले जात आहेत.

मध्य रेल्वेवर मेन, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर झोपडपट्ट्यांची दाटीवाटी आहे. या ठिकाणचे रहिवाशी शॉर्टकट मारण्यासाठी पुलाच्या बाजूला असलेल्या भिंतीला भगदाडं करून चोरावाटा तयार करतात. त्यामुळे त्यांचा वेगाने येणाऱ्या लोकल खाली बळी जातो. त्यामुळे अशा सहा ठिकाणांचा शोध घेऊन त्यावर तारांचे कुंपण उभारण्याचा निर्णय घेतल्याचं मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस.के.जैन यांनी स्पष्ट केलं आहे.


याठिकाणी उभारणार तारांचं कुंपण

चिंचपोकळी ते करी रोड
ठाणे ते ऐरोली
परळ ते दादर


ऑगस्ट 2017 पर्यंतचे रेल्वे क्रॉसिंगचे बळी

कुर्ला -124 ठार
ठाणे -142 ठार
कल्याण - 160 ठार



हेही वाचा

आठवड्याभरात रेल्वे अपघातात ५६ मृत्यू, ७६ जखमी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा