Advertisement

रविवारी मध्य, हार्बरवर मेगाब्लॉक, तर प. रेल्वेवर जम्बोब्लॉक


रविवारी मध्य, हार्बरवर मेगाब्लॉक, तर प. रेल्वेवर जम्बोब्लॉक
SHARES

उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्ती, देखभालीच्या कामासाठी मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल, तर पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वे -

मध्य रेल्वेच्या मुंलुड ते मांटुगा स्थानकांदरम्यान सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावरील वाहतूक सकाळी 10.08 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत अप जलद मार्गावरून चालवण्यात येईल. परिणामी अप धिम्या मार्गावरील लोकल गाड्या नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांवर थांबणार नाहीत. ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल गाड्या सकाळी 10.08 ते दुपारी 3.28 या वेळेत मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील. त्यामुळे या लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटे विलंबाने धावतील. सीएसटीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या धिम्या मार्गांवरील सर्व लोकल गाड्या सकाळी 11 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटे विलंबाने धावतील.

हार्बर रेल्वे -

हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर रेल्वेकडून दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.40 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. सकाळी 9.52 ते संध्याकाळी 4.39 वाजेपर्यंत सीएसटी ते चुनाभट्टी दरम्यानची अप आणि डाऊन मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे वाशी, बेलापूर आणि पनवेलसाठी लोकल धावणार नाहीत. सीएसटी ते वांद्रे-अंधेरी दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सकाळी 10.38 ते दुपारी 4.13 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरून पनवेलकरीता विशेष लोकल चालविण्यात येईल. या ब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावरील प्रवासी रविवारी मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत प्रवास करू शकतील.

पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक - 

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मरीन लाईन्स ते माहीम स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक राहणार आहे. सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत रेल्वेच्या अप आणि डाऊन धिम्या मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक मरीन लाईन्स ते माहीम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवरून चालवण्यात येईल. परिणामी महालक्ष्मी, एलफिन्स्टन रोड आणि माटुंगा रोड स्थानकात लोकल थांबणार नाही. ब्लॉकदरम्यान सर्व लोकल गाड्या लोअर परळ आणि माहीम स्थानकावर थांबतील. रविवारी उपनगरीय मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा