Advertisement

तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक


तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
SHARES

रविवारी लोकलने प्रवास करण्याचा विचार असेल, तर आताच वेळापत्रक तपासून घ्या. कारण
रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य, हार्बर तसेच पश्चिम अशा तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलगाड्यांचे अचूक वेळापत्रक माहीत नसलेल्या प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

असा असेल मेगाब्लॉक :
मध्य रेल्वे -
मुलूंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 वाजेपर्यंंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. सकाळी 10.58 ते दुपारी 4.03 वाजेपर्यंत ठाण्यावरुन सुटणारी अप धिम्या मार्गावरील वाहतूक मुलूंड ते माटुंगा स्थानकादरम्यान अप जलद मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. सीएसटीहून डाऊन जलद मार्गावर सुटणाऱ्या सर्व लोकल गाड्यांना सकाळी 10.08 ते दुपारी 2.42 वाजेपर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलूंड या स्थानकांत थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे या लोकल गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 20 मिनिटे उशिराने धावणार आहेत. तसेच ब्लाॅकदरम्यान सीएसटीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या धिम्या मार्गावरील सर्व लोकल गाड्या सकाळी 11 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे -
हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.39 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. ब्लाॅक दरम्यान हार्बर मार्गावरील सीएसटी ते वाशी, बेलापूर आणि पनवेल दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सकाळी 9.52 ते दुपारी 4.39 वाजेपर्यंत बंद असणार आहे. तसेच सीएसटी ते अंधेरी-वांद्रे स्थानकांदरम्यानची अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक सकाळी 10.38 ते दुपारी 4.43 या वेळेत बंद राहणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला स्थानकातील प्लॅटफार्म क्रमांक 8 वरुन पनवेलकरीता विशेष लोकल चालविण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गावरुन प्रवास करु शकतात.

पश्चिम रेल्वेचा जम्बोब्लाॅक -
पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूज ते गोरेगाव स्थानकादरम्यान जम्बोब्लाॅक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.30 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. ब्लाॅक दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक सांताक्रूज ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. तसेच काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा