Advertisement

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर येत्या रविवारी देखभालीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
SHARES

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर येत्या रविवारी देखभालीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर ठाणे-कल्याण अप व डाउन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल-वाशी अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

सीएसएमटी येथून सकाळी ९.३७ ते दुपारी २.४८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या जलद सेवा ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळविली जाणार असून, ठाणे आणि कल्याण दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबणार आहे. कल्याण येथून सकाळी १०.२६ ते दुपारी ३.१९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येणार असून, कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. मुलुंड येथून त्या अप जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.

बेलापूर/नेरुळ-खारकोपर मार्गाचाही समावेश असणार आहे. पनवेल/बेलापूर येथून सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.४९ ते दुपारी ४.०१ वाजेपर्यंत बंद राहतील, तर सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ वाजेपर्यंत रद्द राहतील.

अप ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ या वेळेत ठाणेकडे जाणाऱ्या सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत विशेष उपनगरी रेल्वे गाड्या सीएसएमटी-वाशी विभागात चालविण्यात येतील. ठाणे-वाशी स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा