रविवार तिन्ही रेल्वेमार्गांसाठी ब्लॉकवार

  Pali Hill
  रविवार तिन्ही रेल्वेमार्गांसाठी ब्लॉकवार
  रविवार तिन्ही रेल्वेमार्गांसाठी ब्लॉकवार
  See all
  मुंबई  -  

  मुंबई - मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गांवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी काम वा काही कारणांमुळे घराबाहेर पडून रेल्वेप्रवास करणाऱ्यांना या ब्लॉकचा त्रास होण्याची शक्यता आहे.  

  मध्य रेल्वे 

  ठाणे ते कल्याण दरम्यान डाउन फास्ट मार्गावर स. 10.30 ते दु. 3.30 पर्यंत दुरुस्तीची कामं होतील. या ब्लॉकदरम्यान ठाणे ते कल्याण दरम्यान डाउन फास्टवरील वाहतूक सकाळी 9.38 ते दुपारी 2.45 पर्यंत डाउन स्लो मार्गानं होईल. त्यामुळे डाउन स्लो लोकल २० मिनिटं उशिरानं धावतील. अप फास्ट लोकलना स. 10.46 ते दु. 3.18 या कालावधीत मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला येथे थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे या लोकल १५ मिनिटांपर्यंत उशिरानं धावण्याची शक्यता आहे.

  हार्बर रेल्वे

  - हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी आणि माहीममध्ये अप आणि डाउन या दोन्ही मार्गांवर स. 11.10 ते दु. 4.40 पर्यंत ब्लॉक आहे. सकाळी 9.52 ते दुपारी 4.39 या काळात सीएसटी ते चुनाभट्टीपर्यंत अप आणि डाउन वाहतूक पूर्णपणे बंद राहील. सीएसटी ते वांद्रे-अंधेरीपर्यंत अप आणि डाउनवरील वाहतूक स. 10.38 ते दु. 4.13 पर्यंत बंद राहील. प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला येथील प्लॅटफार्म क्रमांक 8 वरून पनवेलसाठी विशेष लोकल चालवल्या जातील.

  माहीम-अंधेरी जंबोब्लॉक

  - माहीम ते अंधेरी या हार्बर मार्गावर स. 11 ते दु. 4 पर्यंत अप आणि डाउन मार्गावर दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहेत. या काळात सीएसटी ते अंधेरी वाहतूक बंद राहील. तसंच काही चर्चगेट-अंधेरी-चर्चगेट लोकलही धावणार नाहीत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.