Advertisement

'वर्क फ्रॉम होम'मुळं मेट्रो १ च्या फेऱ्यांमध्ये होणार घट

सरकारनं गर्दी कमी व्हावी यासाठी खासगी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना घरून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याचे आदेश दिले आहेत.

'वर्क फ्रॉम होम'मुळं मेट्रो १ च्या फेऱ्यांमध्ये होणार घट
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनानं डोकं वर काढलं आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकारचीही झोप उडाली असून, राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तसंच सरकारनं गर्दी कमी व्हावी यासाठी खासगी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना घरून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याचे आदेश दिले आहेत. कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत असल्यानं प्रवाशांची गर्दी कमी होण्याची शक्यता असल्यामुळं मेट्रोनं आपल्या सेवेत घट करण्याचा निर्णय घेतला आहे.

मेट्रोच्या प्रवाशांची संख्या घटण्याची शक्यता असून, या मार्गिकेवरील फेऱ्यां कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सरकारने सोमवारी रात्रीपासून कडक नियम लागू केले आहेत. त्याचा परिणाम मेट्रो प्रवाशांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मंगळवारपासून मेट्रो फेऱ्यां कमी केल्या जाणार असल्याचं समजत. त्याचबरोबर मंगळवारी प्रवाशी संख्या पाहून गरज भासल्यास फेऱ्यां वाढवल्या किंवा कमी केल्या जातील, अशी माहिती मेट्रो १ च्या अधिकाऱ्यांनी दिली.

कोरोनामुळं गेल्यावर्षी लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मेट्रो सेवा खंडीत करण्यात आली होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात मेट्रो पुन्हा धावू लागली होती. मात्र तिच्या फेऱ्यां कमी करण्यात आल्या होत्या. सध्या  मेट्रोच्या दरदिवशी २८० फेऱ्यां सुरू होत्या. तसेच कार्यालयीन दिवसात मेट्रोमधून दर दिवशी १ लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करत होते.

सद्यस्थितीत मेट्रोकडून फेऱ्यां कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षेच्यादृष्टीने मेट्रो स्थानकावर प्रवाशांचे तापमान तपासले जाईल, सामाजिक अंतर राखण्याची खबरदारी घेण्यात येईल आणि निर्जंतुकीकरण केले जाईल, त्याचबरोबर मास्क घालणे बंधनकारक असेल.



हेही वाचा

NCBच्या ताब्यात असलेला एजाज खान कोरोना पॉझिटिव्ह

MIDC चा सर्व्हर हॅक केल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा