देव तारी त्याला कोण मारी

    मुंबई  -  

    कुर्ला - देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीची प्रचिती मंगळवारी कुर्ला स्टेशनवर घडलेल्या घटनेनंतर आली. कुर्ला स्टेशनात चालती गाडी पकडण्याच्या घाईत एक तरुण दोन डब्यांतील गॅपमध्ये पडला. मात्र संपूर्ण ट्रेन जाऊनही हा तरुण सुखरुप आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. प्रभात कुमार गुप्ता असं या तरुणाचं नाव आहे. गाडी पकडण्याचा प्रयत्न करताना त्याला भानच राहिलं नाही की, तो दोन डब्यांना जोडणाऱ्या कपलिंगमध्ये उडी घेतोय... ही उडी घेतल्यावर तो थेट खाली, रुळांवर पडला. त्याच्या अंगावरून संपूर्ण गाडी गेली. पण प्रभातच्या फक्त बरगड्यांना दुखापत झाली. त्याच्यावर सध्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.