Advertisement

रेल्वे डब्यात जाणीवपूर्वक टाकली विष्ठा, प्रवाशी घाण वासाने बेजार


रेल्वे डब्यात जाणीवपूर्वक टाकली विष्ठा, प्रवाशी घाण वासाने बेजार
SHARES

रेल्वे स्थानक परिसर अाणि लोकल ट्रेनमध्ये स्वच्छता ठेवण्याविषयी रेल्वेकडून वारंवार सूचना दिल्या जातात. मात्र, तरीही काही लोकांकडून मुद्दाम रेल्वे परिसर अाणि लोकलमध्ये घाण पसरवण्यात येते. अशीच एक घटना बुधवारी सकाळी कल्याण ते दादर ट्रेनमध्ये घडली. या लोकल ट्रेनच्या एका डब्यात कुणीतरी विष्ठा टाकली होती. कळस म्हणजे ती विष्ठा संपूर्ण डब्यात मुद्दाम पसरवण्यात अाली होती. त्यामुळे नाक मुठीतच घेऊन प्रवाशांना प्रवास करावा लागला.  


रेल्वे पोलिसांचं दुर्लक्ष

 कल्याण ते दादर जाणाऱ्या ११.१७ वाजताच्या स्लो ट्रेनमध्ये हा प्रकार आढळून आला. यातील पुरुषांच्या डब्याला लागूनच असलेल्या मधल्या जनरल डब्यातील सीटवर, सीटच्या मागील बाजूस, डब्यातील उभे खांब यावर सर्वत्र विष्ठा लागलेली होती. त्यामुळे या डब्यात प्रचंड वास पसरला होता. तसंच सीटच्या माग विष्ठेने काहीतरी लिहिण्यातही अालं होतं. त्यामुळे या डब्यात चढण्याची कुठल्याही प्रवाशाची हिंमत झाली नाही.  मुंबई लाइव्हची एक प्रतिनिधी कल्याणहून दादरला येत असताना त्यांना ही घाण आढळून आली. त्याच गाडीत महिलांच्या डब्यातून त्याही प्रवास करत होत्या. विद्याविहार स्थानकात उतरून त्यांनी तेथील रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली. पण पोलिसांनी याकडं दुर्लक्ष केलं.


कडक कारवाई करणार 

मध्य रेल्वेशी संपर्क केला असता तात्काळ ती घाण साफ करण्यात येईल असं सांगण्यात आलं. तसंच ज्या कोणी ती घाण केली त्याच्याबद्दल माहिती मिळाल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. पुन्हा जर असा प्रकार आढळला तर त्यावर कडक उपाययोजना केली जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी पी. डी. पाटील. यांनी दिली. गेल्याच आठवड्यात पश्चिम रेल्वेकडून जवळपास १६ रेल्वे स्थानकांवर स्वछता अभियान राबविण्यात आलं होत. ज्यामध्ये विदयार्थी, एनजीओ सहभागी झाल्या होत्या.



हेही वाचा - 

'परे' च्या १६ स्थानकांवर स्वच्छता अभियान

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा