Advertisement

मेट्रोच्या कॉरिडोर विस्तारासाठी MMRDA नं मागवले ७२ अतिरिक्त कोच

मुंबई महानगर प्रदेश विकास प्रादिकरणनं (MMRDA) बंगळुरुस्थित BEML लिमिटेडकडून आणखी मेट्रो कोच मागितले आहेत.

मेट्रोच्या कॉरिडोर विस्तारासाठी MMRDA नं मागवले ७२ अतिरिक्त कोच
SHARES

मुंबई महानगर प्रदेश विकास प्रादिकरणनं (MMRDA) बंगळुरुस्थित BEML लिमिटेडकडून आणखी मेट्रो कोच मागितले आहेत. कारण ते मेट्रो-कॉरिडोरचा विस्तार मीरा-भाईंदर आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत करणार आहेत.

दोन वर्षांपूर्वी, एमएमआरडीएनं ५०४ मेट्रो कोचेसची मागणी केली होती. दहीसर-डीएन नगर, डीएन नगर-मानखुर्द तसंच वांद्रेमार्गे दहिसर-अंधेरी मार्गासाठी या कोचेस मागवल्या होत्या. याचं कंत्राट BEML लिमिटेडला ३ हजार ८१७ कोटीत दिलं होतं.

नवीन ट्रेन एकूण सहा डब्यांसह धावणार असून यात किमान २ हजार ४०० प्रवासी बसू शकतात, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकल्पाची किंमत  ५०१ कोटी इतकी आहे.

या भागातील वाहतुकीची कोंडी दूर करण्याच्या उद्देशाने एमएमआरडीएनं पूर्व द्रुतगती महामार्गावरील दक्षिण-उड्डाण उड्डाणपुलाचे नुकतेच उद्घाटन केले. हा उड्डाणपूल अंधेरी-घाटकोपर लिंक रोड किंवा एजीएलआरचा विस्तार करण्यात आला आहे.

दरम्यान, उपनगरीय रेल्वे सेवा किंवा लोकल गाड्या सर्वसामान्यांसाठी प्रवेश नसल्यामुळे मेट्रो वननं प्रवास केलेल्या प्रवाशांची संख्या गेल्या महिन्याभरात बरीच वाढली असल्याचं आकडेवारीवरून दिसून आलं आहे. एमएमआरडीएनं जानेवारी २०२१ मध्ये मेट्रो २ ए (दहिसर-डीएन नगर) तसेच मेट्रो ७ (दहिसर पूर्व-अंधेरी पूर्व)ची चाचणी सुरू करणं अपेक्षित आहे.



हेही वाचा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा