SHARE

मुंबई - मुंबईकरांची मोनोच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतिक्षा आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. कारण या टप्प्यातील ट्रायल रन पूर्ण झाल्यानंतर आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)ने दुसऱ्या टप्प्यातील सर्व ट्रॅक्शन सब स्टेशन चार्ज केले आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यातच मुंबईकरांचे चेंबुर ते जेकब सर्कल असा थेट मोनो प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आंबेडकरनगर, आचार्य अत्रे आणि लोअर परेल स्थानक अशा तीन ठिकाणी मोनोचे सब ट्रॅक्शन स्टेशन असून आंबेडकरनगर आणि आचार्य अत्रे स्टेशनचे सब ट्रॅक्शन चार्ज करण्यात आले होते. महानगर आयुक्त यु पी एस मदान यांच्या हस्ते नुकतेच लोअर परळ स्थानकावरील सब ट्रॅक्शन स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले. या तिन्ही स्टेशनमधून मोनोला विद्युत पुरवठा केला जाणार असल्याने हा टप्पा मोनो सुरू होण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या