Advertisement

सानपाडा कारशेडमध्ये कामावर असताना मोटरमनला हृदयविकाराचा झटका

सानपाडा येथे लोकल उभी करून, रनिंग रुमकडे जात असताना त्याच्या छातीत दुखू लागले.

सानपाडा कारशेडमध्ये कामावर असताना मोटरमनला हृदयविकाराचा झटका
SHARES

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकातील मोटरमन कक्षात कार्यरत असलेल्या एका मोटरमनला सोमवारी सानपाडा कारशेडमध्ये हृदयविकाराचा झटका आला.

सानपाडा येथे लोकल उभी करून, रनिंग रुमकडे जात असताना त्याच्या छातीत दुखू लागले. यावेळी तेथे उपस्थित रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. सध्या नवी मुंबई येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सानपाडा कारशेडमध्ये सोमवारी रात्री लोकल उभी करून परतलेले मोटरमन सोमनारायण (५७) यांच्या छातीत दुखू लागले. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या गार्डने त्याची चौकशी केली. मात्र, त्यावेळी सोमनारायण काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते.

अखेर गार्डने प्रसंगावधान दाखवत सोमनारायण यांना सानपाडा येथील मुख्य यार्ड मास्टरकडे नेले. त्यानंतर, मुख्य यार्ड मास्टरांनी वाशी येथील एनएमएमसी रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना दिल्या. वाशी येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समजले.

त्यांच्यावर इलेक्ट्रोकार्डिओग्राम (इसीजी) करून औषधे देण्यात आली. तसेच, पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर एंजियोप्लास्टी करण्यात आली. सध्या सोमनारायण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.



हेही वाचा

Mumbai Local News: बोरिवली लोकल चालवतानाच मोटरमन झाला बेशुद्ध

Vande Bharat Express 'या' मार्गांवर धावणार, इतर एक्स्प्रेसपेक्षा तिकिटाचे दर अव्वाच्या सव्वा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा