Advertisement

एसटी आगारात स्मार्ट कार्ड नोंदणीला पुन्हा सुरूवात


एसटी आगारात स्मार्ट कार्ड नोंदणीला पुन्हा सुरूवात
SHARES

एसटी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. लॉकडाउनमुळे बंद करण्यात आलेली स्मार्ट कार्ड नोंदणी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. प्रवाशांना एसटी आगारात जाऊन कार्डची नोंदणी करता येणार आहे.

एसटी प्रवासातील तिकीटदरात सवलतीसाठी स्मार्ट कार्ड नोंदणी करू इच्छिणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. पूर्ण क्षमतेने एसटीची जिल्हा अंतर्गत तसेच आंतर जिल्हा वाहतूक सुरू आहे. प्रवासीही हळूहळू वाढत आहेत. यामुळे स्मार्ट कार्ड संबंधित सर्व कामे अर्थात नोंदणीकरण, नुतनीकरण, रिचार्ज/टॉपअप तातडीने सुरू करण्यात यावे, अशा सूचना महामंडळाने सर्व विभागांना दिल्या आहेत.

विभाग नियंत्रकानी स्थानकातील स्मार्ट कार्ड वितरण केंद्रावर कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर करोना संसर्ग टाळण्यासाठी सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे ही महामंडळाने यावेळी स्पष्ट केले. सध्या राज्यात ३ लाख स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले आहे.

एसटी महामंडळाने स्मार्ट कार्डसाठी फिनो पेमेंट बँकेशी करार केला आहे. स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. १ डिसेंबरपासून प्रवासात तिकिटदरातील सवलतींसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक असणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय