Advertisement

समृद्धी महामार्गावरून लालपरी धावणार, जाणून घ्या तिकट दर

समृद्धी महामार्ग सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

समृद्धी महामार्गावरून लालपरी धावणार, जाणून घ्या तिकट दर
SHARES

आजपासून समृद्धी महामार्गावरून महाराष्ट्राची लालपरी धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सदर महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्याचा लोकार्पण सोहळा रविवारी संपन्न झाला. आता हा वाहनमार्ग सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाकडून उद्यापासून नागपूर ते शिर्डी या मार्गावर शयन आसनी बससेवा सुरू करण्यात येत आहे. या बसमध्ये प्रवाशांना २X१ पद्धतीची ३० आसने (पुशबॅक पद्धतीची) बसण्यासाठी उपलब्ध असून १५ शयन आसने (Sleeper) आहेत.

ही बस ही नागपूर आणि शिर्डी या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री ०९.०० वाजता सुटेल. आणि पहाटे ०५.३० वाजता गंतव्य ठिकाणी पोहोचेल. सदरच्या बससेवेमुळे प्रवाशांच्या सध्याच्या प्रवास अंतरात १०२.५ कि.मी. आणि वेळेमध्ये ४.१५ तासांची बचत होणार आहे. या बससेवेसाठी प्रति प्रौढ व्यक्ति १३०० रुपये आणि मुलांसाठी प्रति ६७० रुपये इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे. तसेच ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना तिकिट दरात १०० टक्के मोफत तर ६५ ते ७५ दरम्यानच्या ज्येष्ठांना ५० टक्के सवलत असणार आहे.

नागपूर ते औरंगाबाद (मार्गे जालना) या मार्गावरही समृद्धी महामार्गाद्वारे शयन आसनी बससेवा सुरू करण्यात येत आहे. सदरची बससेवा ही नागपूर आणि औरंगाबाद या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री १०.०० वाजता सुटेल. जालना मार्गे पहाटे ०५.३० वाजता पोहोचेल. सदर बससेवेमुळे प्रवाशांच्या प्रवास अंतरात ५०.९ कि.मी. आणि प्रवास वेळेमध्ये ४ तास ४० मिनिटं इतकी बचत होणार आहे.

सदर बससेवेमुळे नागपूर ते औरंगाबाद या प्रवासासाठी प्रति व्यक्ति ११०० रुपये आणि मुलांसाठी ५७५ रुपये इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे. तर नागपूर ते जालना या प्रवासासाठी प्रति व्यक्ति ९४५ रुपये आणि मुलांसाठी ५०५ रुपये इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे. तरी प्रवाशांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.



हेही वाचा

Harbour Local News: हार्बर रेल्वेसेवा विस्कळीतच, वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिरानं

पालघर आणि डहाणूतील शेतकरी, व्यापारांसाठी विशेष पार्सल ट्रेनचे नियोजन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा