Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी बोनस

शुक्रवारी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसची घोषणा केल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी बोनस
SHARES

एकीकडे बेस्ट कर्मचारी बोनसवरून संपाच्या तयारीत असताना शुक्रवारी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसची घोषणा केल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे.

एसटीच्या १ लाख ४ हजार कर्मचाऱ्यांना जुलै २०१६ पासून प्रलंबित ११ टक्के महागाई भत्यासह रू २,५०० रुपये आणि २ हजार अधिकाऱ्यांना ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान दिवाळी भेट मिळणार आहे.


रक्कम तात्काळ खात्यात

जुलै २०१६ ते सप्टेंबर २०१७ या १५ महिन्यांचा ७ टक्के थकीत महागाई भत्ता व आॅगस्ट २०१७ ते सप्टेंबर २०१७ चा ४ टक्के प्रलंबित महागाई भत्ता यासाठी ११३ कोटी रूपये आणि सानुग्रह अनुदानापोटी २७ कोटी रूपये असे एकूण १४० कोटी रूपये तात्काळ कामगारांच्या खात्यावर वर्ग करण्याचे आदेश रावते यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.


एकत्रित रक्कम

कामगारांना महागाई भत्याच्या थकबाकीसह १५ हजार ते २० हजार रुपये एकत्रित मिळणार असल्याने एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होईल, अशी आशा रावते यांनी व्यक्त केली.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement