Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन दिवाळीपूर्वी; शासनाकडून १ हजार कोटीचं पॅकेज जाहीर

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील ३ महिन्यांचे थकीत असलेलं पूर्ण वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली

एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन दिवाळीपूर्वी; शासनाकडून १ हजार कोटीचं पॅकेज जाहीर
SHARES

कोरोनाच्या (coronavirus) काळात जीव धोक्यात घालून प्रवाशांना वाहतुक (transport) सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना यंदाची दिवाळी (diwali) आर्थिक अडचणीत जातेय का? ही चिंता सतावत होती. परंतू, कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय परिवहन मंत्री अनिल परब (transport minister anil parab) यांनी घेतला असून, एसटी कर्मचाऱ्यांच्या  (msrtc workers) मागील ३ महिन्यांचे थकीत असलेलं पूर्ण वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली.

एसटी कर्मचाऱ्यांचं पूर्ण वेतन (salary) लवकर मिळावं अशीच भूमिका होती त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर मंगळवारी उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार (deputy chief minister ajit pawar) यांच्या सोबत बैठक झाली असून, यावर मार्ग काढण्यात आला आहे. राज्य शासनाकडून एसटीसाठी पुढील ६ महिन्यासाठी आर्थिक मदत म्हणून १ हजार कोटीचं पॅकेज जाहीर करण्यात आल्याची माहिती अनिल परब यांनी दिली.

लॉकडाऊनमुळं (lockdown) अत्यावश्यक सेवा वगळता ५ महिने एसटीची प्रवासी वाहतुक बंद होती. याकाळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या सुमारे ३ हजार कोटी रुपये महसुली उत्पन्नाचं नुकसान झालं आहे. त्यामुळं इतर खर्च, वेतन, गाड्यांची देखभाल, बसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकीत रक्कम वाढत गेली. आणि कर्मचाऱ्यांचं वेतन थकीत राहिलं आहे.

हळूहळू प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत असून, कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं लवकरच एसटीचं अर्थकारण पूर्वपदावर येणार आहे. राज्य शासनाकडूनही आता आर्थिक मदत मिळाल्यानं एसटीच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार असल्याचंही अनिल परब यांनी स्पष्ट केलं.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा