इतिहासजमा ट्राम लवकरच मुंबईकरांच्या भेटीला

इतिहासजमा ट्रामच्या डब्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरच्या भाटिया बागेत ही ट्राम ठेवण्यात येणार आहे.

SHARE

गेल्या अनेक वर्षांपूर्वी रस्त्यावरच्या रुळांवरून धावणारी आणि बेस्टची ओळख असलेली ट्राम आता इतिहासजमा झाली आहे. जुन्या पिढीनं ट्राममधून प्रवास केला असला, तरी आजच्या पिढीसाठी ट्राम कुतूहलाचा विषय ठरत आहे. त्यामुळं ट्रामच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी महापालिकेनं ट्रामची प्रतिकृती तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील बेस्टच्या आणिक आगारात गेल्या कित्येक महिन्यांपासून ट्रामचा सांगाडा पडून आहे. ट्रामच्या या डब्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरच्या भाटिया बागेत ही ट्राम ठेवण्यात येणार आहे.


लवकरच मुंबईकरांना ट्रामचे दर्शन

पालिकेतर्फे मेसर्स ऍन्थोनी गॅरेज यांना या ट्रामची नव्यानं बांधणी करण्याचं कंत्राट देण्यात आलं आहे. तसंच, ट्रामच्या या डब्याच्या पुर्नबांधणीसाठी १५ लाख ७३ हजार रुपये खर्च करणार आहे. दरम्यान, याबाबत पालिकेनं बेस्ट प्रशासन समितीकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला बेस्ट समितीकडून मंजुरी मिळाली आहे. लवकरच या ट्रामची बांधणी करण्यात येणार आहे. त्यामुळं आता लवकरचं मुंबईकरांना इतिहासजमा ट्राम पाहता येणार आहे.


ट्रामची अशी झाली होती सुरुवात

बॉम्बे ट्रामवे कंपनी, महापालिका, 'स्टर्न्स अॅण्ड किटरेज' कंपनी यांच्यामध्ये करार करण्यात आल्यानंतर १९७३ साली बॉम्बे ट्रामवे कंपनीची स्थापना करण्यात आली. ९ मे १९७४ रोजी घोड्यांद्वारे ओढली जाणारी पहिली ट्राम मुंबईमध्ये धावली. कुलाबा ते पायधुणी आणि बोरीबंदर ते पायधुणी अशा मार्गांवर धावलेल्या ट्रामसाठी केवळ तीन आणे भाडे ठरवण्यात आले होते. त्यानंतर प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर तिकीट कमी करुन ते दोन आणे करण्यात आले होते.हेही वाचा

बेस्टच्या भंगार बसगाड्याचा वापर फिरत्या शौचालयासाठी होणार ?

बेस्टने संपाचा पगार कापल्यानं कर्मचाऱ्यांसह सदस्यही नाराज
संबंधित विषय
ताज्या बातम्या