Advertisement

बेस्टने संपाचा पगार कापल्यानं कर्मचाऱ्यांसह सदस्यही नाराज

विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी ७ जानेवारी रोजी पुकारलेल्या संपाचा पगार प्रशासनानं कापल्यानं कर्मचाऱ्यांसह बेस्ट समिती सदस्यही नाराज झाले आहेत. प्रशासनाच्या या पावलामुळे दुखावलेले बेस्ट कर्मचारी प्रचंड संतापले आहेत.

बेस्टने संपाचा पगार कापल्यानं कर्मचाऱ्यांसह सदस्यही नाराज
SHARES

विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी ७ जानेवारी रोजी पुकारलेल्या संपाचा पगार प्रशासनानं कापल्यानं कर्मचाऱ्यांसह बेस्ट समिती सदस्यही नाराज झाले आहेत. प्रशासनाच्या या पावलामुळे दुखावलेले बेस्ट कर्मचारी प्रचंड संतापले आहेत.

वेतनवाढीसोबतच इतरही मागण्यांसाठी मागच्या महिन्यात बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. संप तब्बल नऊ दिवस लांबल्याने ऐतिहासिक ठरला. त्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बेस्ट प्रशासनानं दिलेल्या आश्वासनानु कर्मचाऱ्यांच्या जानेवारी महिन्याच्या पगारात वाढ केली. मात्र संपकाळातील नऊ दिवसांचा पगार कापल्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण आहे. दरम्यान,कर्मचाऱ्यांच्या नऊ दिवसांच्या कापलेल्या पगाराबाबत न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील भूमिका घेण्यात येणार असल्याचं, बेस्ट प्रशासनानं म्हटलं आहे.


बेस्ट समिती सदस्य नाराज

गुरुवारी बेस्ट समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर दिले जात नसल्याचे तीव्र पडसाद उमटले. वेतन कापल्यामुळं कर्मचाऱ्यांसोबतच बेस्ट समिती सदस्यांनीही नाराजी व्यक्त केली. दरम्यान, याप्रकरणी मार्ग काढण्याची सूचना बेस्ट समिती अध्यक्ष्यांनी केली आहे.


न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील भूमिका

संप बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट करत औद्योगिक न्यायालयानं कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास मनाई केली होती. तसंच, यानंतर बेस्ट प्रशासनानं कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई केली होती. मात्र, संपकाळातील कर्मचाऱ्यांचा पगार कापणं किंवा न कापण्याबाबत आोद्योगिक न्यायालयानं स्पष्ट केलं नव्हतं. दरम्यान बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मुंबई उच्च न्यायलयानं मध्यस्थ्याची नेमणूक केली असून, हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळं न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर बेस्ट प्रशासन भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं जात आहे.हेही वाचा -

‘व्हॅलेंटाइन डे’ला अवतरली आदितीची ‘राधा’

Movie Review : गली बॉय' के मन की 'मुराद'!Read this story in हिंदी
संबंधित विषय