Advertisement

‘व्हॅलेंटाइन डे’ला अवतरली आदितीची ‘राधा’


‘व्हॅलेंटाइन डे’ला अवतरली आदितीची ‘राधा’
SHARES
Advertisement

अभिनेत्री अदिती द्रविडने ‘व्हँलेंटाईन्स डे’ निमित्ताने आपल्या चाहत्यांना एक प्रेमळ भेट दिली आहे. गुलाबी रंगात रंगलेलं आदितीचं ‘राधा’ हे मॅशअप नुकतंच रिलीज झालं आहे. ‘मोहे रंग दो लाल…’ आणि ‘मी राधिका…’ या दोन गाण्यांच्या मॅशअपमध्ये आदिती राधा बनून सुंदर नृत्यविलास करताना दिसते.


गाण्याविषयी अदिती म्हणते....

‘राधा’ गाण्याविषयी अदिती म्हणते की, उत्कट प्रेमाचं निरागस रूप म्हणजे राधा. प्रेमात आकंठ बुडालेली राधा रंगवताना भरतनाट्यम् डान्सर असल्याचा फायदा झाला. भारतीय शास्त्रीय नृत्यात राधा-कृष्णाचा प्रणय, प्रेमातला दूरावा, ताटा-तूट या संदर्भातल्या अनेक कथा आहेत. मी शास्त्रीय नृत्यांगना असल्यानं मला या कथा, त्यातले भाव आणि पदन्यास माहित होते. त्यामुळेच राधा गाण्यात मी ते भाव उत्तम पध्दतीने उतरवू शकले.

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने हे गाणं आदितीनं रसिकांसमोर आणलं आहे. प्रेम या भावनेबाबत आदिती म्हणाली की, व्हँलेटाईन डेला आपण प्रेमाच्या दिव्यत्वाविषयी बोलतो. प्रेमातली ही दैवी भावना या गाण्याच्या शूटिंग वेळी अनुभवता आली. स्वत:ला विसरून दुसऱ्यावर समर्पित भावनेनं प्रेम करण्याची कल्पना मला नेहमीच आवडते. मी त्या ‘ओल्ड स्कूल लव्ह स्टोरी’ज मानते. या व्हिडीओच्या शूटिंगच्या दरम्यान त्या समर्पित प्रेमातली उत्कटता माझ्या अतरंगाला स्पर्शून गेली.

आदितीवर चित्रीत करण्यात आलेलं हे गाणं टायनी टॉकिज प्रस्तुती असून, पियुष कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलं आहे. प्रेमावर आधारित असलेलं हे मॅशअप गायिका सुवर्णा राठोडनं गायलं आहे.हेही वाचा -

EXCLUSIVE : अण्णांची 'शेवंता' हा तरी कोण?

अजब गणित! आठवडा एक, सिनेमे ५२?संबंधित विषय
Advertisement