Advertisement

विमानतळावर 'या' देशातून येणाऱ्यांनीच RT-PCR प्री-बुक करावी

संभ्रम दूर करण्यासाठी एटरपोर्ट प्रशासनाकडून एक नवीन अधिसुचना काढण्यात आली आहे.

विमानतळावर 'या' देशातून येणाऱ्यांनीच RT-PCR प्री-बुक करावी
SHARES

मुंबईत उड्डाण करणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचण्या प्री-बुक करण्याची गरज नाही. संभ्रम दूर करण्यासाठी एक नवीन अधिसुचना काढण्यात आली आहे.

नव्या अधिसुचनेनुसार, केवळ जोखीम असलेल्या देशातून आलेले किंवा १४ दिवसांपूर्वी त्या राष्ट्रांपैकी एकात गेलेल्यांनीच आरटी-पीसीआर चाचण्या प्री-बुक करणं आवश्यक आहे.

TOI मध्ये दिलेल्या वृत्तानुसार, एअरलाईन्स सुविधा पुरवणाऱ्या पोर्टलनं मंगळवारी त्यांच्या प्रवासी सल्ल्यामध्ये सुधारणा केली. त्यात म्हटलं आहे की, “नवीनतम सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद या ६ मेट्रो शहरांमध्ये 'जोखीम असलेल्या देशां'मधून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचण्या प्री-बुक करणं अनिवार्य आहे. २० डिसेंबर २०२१ पासून येणाऱ्यांसाठी हा नियम लागू होईल.”

यापूर्वी सांगण्यात आलं होतं की, मुंबईत येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचण्या प्री-बुक करणं आवश्यक आहे. हा निर्णय आधीच्या महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार घेण्यात आला होता.

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर RT-PCR चाचणीसाठी ऑनलाइन स्लॉट कसे प्री-बुक करू शकतात ते पाहा.

  • www.newdelhiairport.in ला भेट द्या. त्यानंतर वरच्या पॅनेलवर ‘कोविड-१९ चाचणी बुक करा’ हे शोधा.
  • त्यानंतर पुढे, प्रवासाचा प्रकार निवडा (या प्रकरणात, आंतरराष्ट्रीय आगमन).
  • नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, आधार कार्ड/पासपोर्ट क्रमांक, पत्ता, भेटीची तारीख, वेळ स्लॉट इत्यादी सर्व वैयक्तिक तपशील भरा.
  • सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर, चाचणीचा प्रकार निवडा (या प्रकरणात, RT-PCR, रॅपिड पीसीआर चाचणी देखील उपलब्ध आहे.)
  • स्क्रीनवर दाखवलेल्या सूचनांचे अनुसरण करा आणि विमानतळावर आगमन झाल्यावर तुमच्या RT-PCR चाचणीसाठी एक स्लॉट बुक करा.
  • RT-PCR चाचणीसाठी, प्रवाशाला ५०० रुपये द्यावे लागतील, तर दुसरीकडे, रॅपिड PCR चाचणीची किंमत ३,५०० आहे.
  • पूर्वीच्या बाबतीत, चाचणीचे निकाल ६-८ तासांत उपलब्ध होतील, तर नंतरचा कालावधी फक्त ३० मिनिटे ते दीड तासाचा आहे.
  • IGI विमानतळावर किंवा त्यामार्गे प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी चाचणी सुविधा उपलब्ध आहे.
  • याव्यतिरिक्त, प्रवाशांना त्यांच्या भेटीची वेळ पुन्हा शेड्यूल करण्याचा किंवा बुकिंग पूर्णपणे रद्द करण्याचा पर्याय आहे.हेही वाचा

RT-PCR चाचणीसाठी ऑनलाइन स्लॉट कसा प्री-बुक कराल?

लसीकरण पुर्ण न झालेल्यांना सार्वजनिक वाहतुकीत 'नो एन्ट्री'

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा