Advertisement

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील 'या' लोकल 28 आणि 29 ऑक्टोबरला रद्द

रेल्वेने या गाड्यांची यादीही जारी केली आहे.

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील 'या' लोकल 28 आणि 29 ऑक्टोबरला रद्द
SHARES

पश्चिम रेल्वेने वांद्रे आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सहावी मार्गिका सुरू करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत मुंबईतील 2,500 हून अधिक लोकल ट्रेन सेवा रद्द करण्याची घोषणा केली. यासोबतच रेल्वेने या गाड्यांची यादीही जारी केली आहे.

यापूर्वी, पश्चिम रेल्वेने सांगितले होते की, त्यांनी 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत मुंबईतील 2,500 हून अधिक लोकल ट्रेन सेवा रद्द केल्या आहेत. 

माहिती देताना, पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर म्हणाले की, मोठ्या प्रमाणावर काम असले तरीही, रेल्वे वाहतुकीला कमीत कमी व्यत्यय आणि प्रवाशांची गैरसोय होण्यासाठी ब्लॉकचे काळजीपूर्वक नियोजन करण्यात आले आहे.

मुंबई लोकल ट्रेन रद्द

विरारच्या दिशेने

  • 27-28 ऑक्टोबर: 128 गाड्या रद्द
  • 29 ऑक्टोबर: 116 गाड्या रद्द
  • 30 ऑक्टोबर-3 नोव्हेंबर: 158 गाड्या रद्द
  • 4 नोव्हेंबर: 46 गाड्या रद्द
  • 5 नोव्हेंबर : 54 गाड्या रद्द

चर्चगेटच्या दिशेने

  • 27-28 ऑक्टोबर: 127 गाड्या रद्द
  • 29 ऑक्टोबर: 114 गाड्या रद्द
  • 30 ऑक्टोबर-3 नोव्हेंबर: 158 गाड्या रद्द
  • 4 नोव्हेंबर : 47 गाड्या रद्द
  • 5 नोव्हेंबर: 56 गाड्या रद्दहेही वाचा

ठाणे : मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक मार्गात बदल

नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन 30 ऑक्टोबरला होण्याची शक्यता

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा