Advertisement

पावसाचा शताब्दी एक्सप्रेसला फटका


पावसाचा शताब्दी एक्सप्रेसला फटका
SHARES

सोमवार ९ जुलै आणि मंगळवार १० जुलै ला मुंबईत झालेल्या पावसामुळे जनजीवन चांगलेच विस्कळीत झाले होते. याचा सर्वाधिक फटका बसला तो रेल्वेला. मुंबईच्या तीनही मार्गावरील रेल्वेसेवा या पावसामुळे विस्कळीत झाली होती.

मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेसला या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. शताब्दी एक्सप्रेसचे वातानुकुलित डबे (एसी चेअर कार) मोठ्या प्रमाणात क्षतीग्रस्त झाले आहेत. त्यामध्ये अाता पश्चिम रेल्वेकडून दुरुस्ती करण्यात येत अाहे. प्रवाशांना नवीन आसनव्यवस्था लवकरच उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

नवीन आसन व्यवस्था

दुरुस्तीमुळे शताब्दी एक्सप्रेस (१२००९-१२०१०) सध्या रद्द करण्यात आली अाहे.या गाडीला ३ एक्झिक्युटिव्ह वातानुकुलीत चेयर कार, २ एसी चेयर कार, १ अनुभुती कोच आणि १२ तृतीय श्रेणी वातानुकुलीत डबे अाहेत, १३ जुलैपासून पुन्हा ती रुळावर धावण्यास सज्ज होणार आहे. ज्या प्रवाशांनी या गाडीचे आरक्षण केलं आहे त्यांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात येणार असल्याचं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. सहकार्य करण्यासाठी सर्व प्रवाशांना पश्चिम रेल्वेकडून विनंती करण्यात आली आहे.



हेही वाचा - 

आषाढी यात्रेसाठी मध्य रेल्वेची विशेष गाडी

एसटीची 'शयनयान' लवकरच प्रवाशांच्या सेवेत




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा