Advertisement

CSMT स्टेशनवरील रेस्टॉरंट-ऑन-व्हील्स 23 ऑक्टोबरपासून बंद होणार

CSMT च्या प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पाचे कारण सांगून, CR ने त्याच्या कराराचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे, जो ऑक्टोबर 2023 मध्ये संपत आहे.

CSMT स्टेशनवरील रेस्टॉरंट-ऑन-व्हील्स 23 ऑक्टोबरपासून बंद होणार
SHARES

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) च्या प्लॅटफॉर्म 18 च्या बाहेर असलेले लोकप्रिय 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' हे ऑक्टोबर 2023  पासून बंद होणार आहे. मध्य रेल्वेने (CR) हा निर्णय घेतला आहे.

सीएसएमटीच्या प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पाचे कारण यासाठी देण्यात आले आहे. तसेच 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' च्या कराराचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता आहे. कारण या कराराची मुदत ऑक्टोबरमध्ये संपत आहे.

एका वरिष्ठ सीआर अधिकाऱ्याने सांगितले की, ते जवळपासच्या परिसरात अशीच सुविधा सुरू करण्यासाठी नवीन निविदा काढण्याची शक्यता  आहे.

ऑक्टोबर 2021 मध्ये त्याची स्थापना झाल्यापासून, बोगी-वोगी सर्व वयोगटातील लोकांसाठी एक आकर्षण बनले आहे. त्याच्या अनोख्या संकल्पनेमुळे  दर महिन्याला सुमारे ६,५०० ते ७,००० प्रवासी तिकडे येतात, ज्यात मोठ्या संख्येने तरुण आणि विद्यार्थी असतात.

अनोखे आकर्षण

खास डिझाइन केलेल्या रेल्वे कार रेस्टॉरंटमध्ये 40 जण बसण्याची क्षमता आहे. रेस्टॉरंट्स ऑन व्हिल हे त्यांच्या वैविध्यपूर्ण मेनूसाठी लोकप्रिय आहे. ज्यात शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थांचा, विशेष उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय आणि प्रादेशिक पदार्थांचा समावेश आहे.

परवडणाऱ्या किमती, स्वाद आणि खाद्यपदार्थांची गुणवत्ता यामुळे ते प्रवासी आणि पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे.

"CSMT पुनर्विकास प्रकल्पाची निविदा प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे, लवकरच काम सुरू होईल. CSMT पुनर्विकास प्रकल्पासाठी प्लॅटफॉर्म 18 च्या बाहेर असलेल्या 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स'सह पुनर्स्थापित करणे आवश्यक आहे," CR च्या अधिकाऱ्याने सांगितले.

नेमकी जागा निश्चित केलेली नसली तरी, मध्य रेल्वे दादर किंवा लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे नवीन 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' सुरू करण्याचा विचार करत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

रेस्टॉरंट-ऑन-व्हील इतर स्थानकांवर नियोजित

तथापि, रेल्वे अधिकारी भविष्यात दादर आणि एलटीटीसह इतर स्थानकांवर अशीच रेस्टॉरंट सुरू करण्याची योजना आखत आहेत.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा