Advertisement

मुंबई रेल्वे स्थानकांवरील सरकत्या जिन्यांवर अ‍ॅपची नजर

मध्य रेल्वे स्थानकातील 80 टक्के सरकते जिने आपत्कालीन बटण दाबल्यामुळे बंद पडल्याचे आढळले आहे.

मुंबई रेल्वे स्थानकांवरील सरकत्या जिन्यांवर अ‍ॅपची नजर
SHARES

मुंबई रेल्वे स्थानकांवरील सरकते जिन्यांवर मध्य रेल्वेने अॅप-वेब आधारित यंत्रणा कार्यान्वित केली आहे. यामुळे सरकते जिने बंद झाल्यास तातडीने त्याची सूचना मध्य रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला मिळणार आहे. मध्य रेल्वे स्थानकातील 80 टक्के सरकते जिने आपत्कालीन बटण दाबल्यामुळे बंद पडल्याचे आढळले आहे.

यंत्रणेच्या मदतीने सर्व सरकते जिन्यांवर मध्यवर्ती नियंत्रण कक्षातील नियंत्रकांकडून देखरेख ठेवली जाते. एखाद्या फलाटावरील सरकता जिना बंद पडल्यास त्याची सूचना यंत्रणेच्या माध्यमाने कक्षाला मिळते.

मुंबई विभागात 118 यंत्रणा सर्व सरकत्या जिन्यांमध्ये कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सरकत्या जिन्यांची नियोजित देखभाल-दुरुस्ती प्रलंबित असल्यास त्याचीही माहिती यंत्रणेमार्फत नियंत्रण कक्षाला मिळणार आहे.

रेल्वे स्थानकातील फलाटावर बंद पडलेले सरकते जिने मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून कार्यान्वित करण्यासाठी तंत्रज्ञान बाजारात उपलब्ध आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने नियंत्रण कक्षातून बंद पडलेले सरकते जिने सुरू करण्यासाठी चाचणी सुरू आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर हे तंत्रज्ञान रेल्वेच्या सरकत्या जिन्यांमध्ये कार्यान्वित करण्यात येईल. त्यामुळे भविष्यात नियंत्रण कक्षामधूनच सरकते जिने सुरू करता येणे शक्य आहे, असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.



हेही वाचा

दुरांतोसह 'या' १० मेल-एक्स्प्रेस गाड्यांना कल्याणमध्ये थांबा

पश्चिम रेल्वेचा 24 ऑगस्टला पॉवर ब्लॉक, 'या' ट्रेन्स रद्द

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा