Advertisement

दुरांतोसह 'या' १० मेल-एक्स्प्रेस गाड्यांना कल्याणमध्ये थांबा

हा थांबा सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दुरांतोसह 'या' १० मेल-एक्स्प्रेस गाड्यांना कल्याणमध्ये थांबा
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या दुरांतोसह दहा मेल-एक्स्प्रेसला कल्याण स्थानकात अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

कल्याणसह नागपूर, कोपरगाव, कान्हेगाव आणि होटगी स्थानकांतही निवडक लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना थांबा देण्यात आला आहे. हा थांबा सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर असून, या गाड्या दोन मिनिटांसाठी कल्याण स्थानकात थांबतील.

- २३ ऑगस्टपासून १२२६१/२ सीएसएमटी-हावडा-सीएसएमटी दुरांतो, ८२३५५ पाटणा-सीएसएमटी, १८५१९ विशाखापट्टणम-एलटीटी, १७२२१ काकीनाडा पोर्ट-एलटीटी या गाड्यांना कल्याण स्थानकात थांबा.

- २५ ऑगस्टपासून ८२३५६ सीएसएमटी-पाटणा सुविधा आणि १८५२० एलटीटी-विशाखापट्टणम एक्स्प्रेसला कल्याण स्थानकात थांबा.

- २४ ऑगस्टपासून १९६६८ म्हैसूर-उदयपूर सिटी  हमसफर, १७२२१/२ काकीनाडा पोर्ट-एलटीटी-काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेसला कल्याण स्थानकात थांबा.

२६ ऑगस्टपासून १२२१३/४ यशवंतपूर-दिल्ली सराई-यशवंतपूर रोहिला दुरांतो एक्स्प्रेसला नागपूर स्थानकात थांबा.

२८ ऑगस्टपासून १९६६७ उदयपूर सिटी-म्हैसूर हमसफर एक्स्प्रेसला कल्याणमध्ये थांबा.

२३ ऑगस्टपासून १७३१९/२० हैदराबाद-हुबळी-हैदराबाद एक्स्प्रेसला २३ ऑगस्टपासून कल्याणमध्ये थांबा.

२६ ऑगस्टपासून १२२१३/४ यशवंतपूर-दिल्ली सराई-यशवंतपूर रोहिला दुरांतो एक्स्प्रेसला नागपूर स्थानकात थांबा.

२३ ऑगस्टपासून १७३१९/२० हुबळी-हैदराबाद-हुबळी एक्स्प्रेसला होटगी स्थानकात थांबा.

२४ ऑगस्टपासून १८५०३/४ विशाखापट्टाणम-साईनगर शिर्डी– विशाखापट्टणम एक्स्प्रेसला कोपरगाव स्थानकात थांबा.

२३ ऑगस्टपासून ११४०९/१० दौंड-निजामाबाद-दौंड एक्स्प्रेसला कान्हेगाव स्थानकात थांबा.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा