Advertisement

देशातील पहीली एसी डबल डेकर बस मुंबईत 'या' तारखेला लाँच होणार

आता नव्या अत्याधुनिक इलेक्ट्रीक अवतारात मुंबईकरांच्या सेवेसाठी हजर होत आहे.

देशातील पहीली एसी डबल डेकर बस मुंबईत 'या' तारखेला लाँच होणार
SHARES

मुंबईकरांची आवडती डबलडेकर ( DOUBLEDECKER ) आता नव्या अत्याधुनिक इलेक्ट्रीक अवतारात मुंबईकरांच्या सेवेसाठी हजर होत आहे. पुढच्या आठवड्यातच या डबल डेकर बसचा प्रवास सुरू होणार आहे.

सुरूवातीला सांताक्रुझ ते कुर्ला मार्गावर तिला इंट्रोड्यूस करण्याची योजना आहे. ही डबल डेकर बॅटरीवर धावणार असून संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या डबलडेकरला दोन दरवाजे आहेत.

येत्या मार्च अखेर अशा 200 एसी इलेक्ट्रीक (  Ac Electric  ) डबल डेकर बेस्टच्या  ( BEST ताफ्यात समाविष्ठ होणार आहेत.

सुरूवातीला सांताक्रुझ ते कुर्ला या मार्गावर या डबल डेकर बस चालवल्या जाणार आहेत. बेस्टचे महाव्यवस्थापकांनीच ही माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे.

कुलाबा, मजास, आणि कुर्ला डेपोत या बसेस उभ्या करण्याची सोय करण्याची योजना आहे. त्यासाठी कुलाबा, मजास, आणि कुर्ला आगारांत बसेसच्या चार्जिंग पॉईंटची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.

नव्या ई- डबल डेकरमध्ये 78 प्रवाशांच्या बसण्याची व्यवस्था आहे. या बसेसना दोन दरवाजे आहेत. या बसेसची रंगसंगती आकर्षक असून या बसेस लंडनच्या स्विच मोबिलीटी या कंपनीच्या असून भारतात त्यांनी हिंदूजा ग्रुप बरोबर करार केला आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देशातील पहिल्या ईलेक्ट्रीक डबल डेकरचे अनावरण गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात यशवंतराव चव्हाण सेंटर येथे एका भव्य सोहळ्यात करण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वी सुमारे 50 हजार कोटींचा मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला असून त्यात बेस्टच्या ताफ्यात तीन हजार नविन इलेक्ट्रीक बसेस सामाविष्ट करण्याची बेस्टची योजना असल्याचे म्हटले होते.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा