गणेशोत्सवा दरम्यान विविध गणेश मंडळांना भेट देण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. यामुळे गुरुवारपासूनच विशेषत: दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा सामना देखील करावा लागत आहे.
पार्किंगच्या समस्या दूर करण्यासाठी आणि अनधिकृत पार्किंगमुळे होणारे अडथळे टाळण्यासाठी, बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) ने वडाळा बस डेपोमध्ये भाविकांसाठी 'पे अँड पार्क' सेवा सुरू केली आहे.
"मुंबईत वाहन चालवण्यापेक्षा पार्किंगची जागा शोधणे अधिक कठीण आहे. रस्त्यावर पार्क केलेली वाहनांमुळे अडथळा तर होतोच. शिवाय अनधिकृत पार्किंगसाठी दंड देखील आकारला जातो. उत्सवामुळे अनेक रस्ते बंद असल्याने, अनधिकृत पार्किंगमुळे पर्यायी मार्गांवर गर्दी वाढू शकते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, वडाळ्यातील लोकप्रिय GSB गणपती आणि राम मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी बेस्टने वडाळा बस डेपोत पार्किंगची सेवा सुरू केली आहे," असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
'पे अँड पार्क' सुविधा 17 सप्टेंबर 2024 रोजी उत्सव संपेपर्यंत उपलब्ध असेल.
सशुल्क पार्किंग व्यवस्थेमुळे दुचाकी आणि चारचाकी दोन्ही वाजवी दरात उभ्या केल्या जाऊ शकतात. ज्यामुळे गणपती उत्सवादरम्यान भाविकांना सोयीस्कर होईल. या सुविधेचा उद्देश रस्त्यालगतच्या पार्किंगला परावृत्त करणे आणि उत्सवादरम्यान सुरळीत रहदारी सुनिश्चित करणे हा आहे.
11 सप्टेंबर रोजी रात्री 8.13 वाजता त्यांच्या ट्विटर अधिकृत हँडलवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, बेस्टने घोषणा केली की, "#GSB गणपती वडाळा राम मंदिराला भेट देत आहात - 17 सप्टेंबरपर्यंत गणपती उत्सवादरम्यान वडाळा बस डेपोमध्ये PAY आणि PARK सुविधा उपलब्ध आहे. रस्त्याच्या कडेला अनधिकृत पार्किंग टाळण्यासाठी भाविकांसाठी खास पर्याय उपलब्ध केला आहे."
हेही वाचा