वाहतूक कंपनी असलेली उबेर (Uber)ने देशात 'Uber Black' श्रेणी लाँच करण्याची घोषणा केली आहे. उबेरने प्रीमियम ऑफरकडे भारतीय ग्राहकांची वाढती पसंती लक्षात घेऊन याची सुरूवात मुंबईपासून होणार आहे. भारतीय ग्राहकांची वाढती पसंती लक्षात घेता उबेरकडून आता मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.
दरम्यान, टॅक्सी सेवा देणारी कंपनी उबेरने देशात आपली 'Uber Black' श्रेणी लाँच करण्याची घोषणा केली असून याची सुरुवात मुंबईपासून होणार आहे. या प्रीमियम ऑफरकडे भारतीय ग्राहकांची वाढती पसंती लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
भारतीय ग्राहकांच्या वाढत्या आकांक्षा पूर्ण करणे यामागचे उद्दिष्ट आहे. भारतीय रस्त्यांवर ‘बिझनेस क्लास’सारखी व्यवस्था करण्यासाठी कंपनीने ‘उबेर ब्लॅक’ अगदी नवीन अवतारात लाँत करण्यास उत्सुक आहोत, असे उबेर कंपनीचे अध्यक्ष(भारत आणि दक्षिण आशिया) प्रभजीत सिंग यांनी सांगितले.
काय सुविधा मिळणार?
सायलेंट मोड, तापमान नियंत्रण, सामान ठेवण्यासाठी मदत अशा अनेक सुविधा उबर ब्लॅकमध्ये देण्यात आल्या आहेत. यात वैयक्तिक प्रवासाची सुविधाही उपलब्ध आहे. प्रवास करताना ग्राहकांना कारमधील वैशिष्ट्ये आणि प्राधान्यांचा आनंद घेता येईल. यामुळे त्यांना प्रवासादरम्यान उच्च दर्जाचा अनुभव मिळेल.
उबेर ब्लॅक अतुलनीय आराम, सोयीसह राइडचा चांगला अनुभव देण्यासाठी डिझाइन केले आहे. उबेर ब्लॅकची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :-
उबर ब्लॅक ट्रिप कशी बुक करावी:
हेही वाचा