Advertisement

रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ पुढे ढकलण्याची मागणी

रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ ही सर्वांसाठीच त्रासदायक ठरणारी आहे.

रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ पुढे ढकलण्याची मागणी
SHARES

रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ ही सर्वांसाठीच त्रासदायक ठरणारी आहे. रिक्षा, टॅक्सी चालक-मालकांचे नुकसान होईलच, शिवाय ग्राहकदेखील यामध्ये भरडले जातील. त्यामुळे भाडेवाढीऐवजी या भाडेवाढीला सहा महिने ते एक वर्ष मुदतवाढ द्यावी, अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतने केली आहे.

राज्य सरकारने रिक्षा व टॅक्सीच्या भाडेदरात अनुक्रमे २.०१ व २.०९ पैसे दरवाढ सुचवली आहे. १ मार्चपासून ही दरवाढ लागू होणार आहे. पण यामुळे रिक्षा व टॅक्सी चालक-मालकांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. ग्राहकांचा आर्थिक बोजा वाढवणारा हा निर्णय आहे. त्यामुळेच ही दरवाढ करण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतने तीन पर्याय सुचवले आहेत.

'रिक्षा व टॅक्सीच्या भाडेदरात ५ वर्षांत वाढ झालेली नाही. त्यामुळे ती करणे अत्यावश्यक होते. पण या दरवाढीचा उलट परिणाम होणार आहे. कोरोना संकटामुळे ग्राहक आर्थिक अडचणीत आहेत. ते आता रिक्षा, टॅक्सीचा वापर करणारच नाहीत. यामुळे वाहनचालक आणखी अडचणीत येतील', असं ग्राहक पंचायतचे कार्याध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे यांनी सांगितले की,

भाडेवाढ टाळण्याबाबत ग्राहक पंचायतने रिक्षा व टॅक्सीबाबत राज्य सरकारला तीन पर्याय सुचवले आहेत. ही भाडेवाढ १ मार्चऐवजी ६ महिने पुढे ढकलली जावी, असा पहिला पर्याय सुचवण्यात आला आहे.

अथवा १ मार्चपासून पुढील वर्षभरासाठी मूळ भाड्यात १ रुपया व पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी ७५ पैसे वाढ करावी, तसेच उर्वरित भाडेवाढ एक वर्षाच्या कालावधीनंतर करावी, असा दुसरा पर्याय देण्यात आला आहे.

अथवा मूळ भाड्यात २ रुपये सरसकट भाडेवाढ करावी व राज्य सरकारने रिक्षा व टॅक्सीसाठी ठरवून दिलेली मूळ भाड्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठीची अनुक्रमे २.०१ रुपये व २.०९ रुपये ही भाडेवाढ वर्षभरासाठी स्थगित करावी, असा तिसरा पर्याय ग्राहक पंचायतने राज्य सरकारला सुचवला आहे. यापैकी कुठल्याही एका प्रकारे भाडेवाढ केल्यास ही ती ग्राहकांना सुसह्य होईल. तसेच रिक्षा, टॅक्सी चालक-मालकांचेही नुकसान होणार नाही, अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतने राज्य सरकारकडे केली आहे.

तीन पर्याय

  • कोरोना काळातील प्रवाशांची आर्थिक परिस्थिती पाहता रिक्षा-टॅक्सीची केलेली भाडेवाढ १ मार्चऐवजी सहा महिने पुढे ढकलली जावी.
  • १ मार्चपासून पुढील वर्षभरासाठी मूळ भाड्यात १ रुपया व पुढील प्रत्येक किमीसाठी ७५ पैसे वाढ करावी, तसेच उर्वरीत भाडेवाढ एक वर्षानंतर करावी.
  • मूळ भाड्यात २ रुपये सरसकट भाडेवाढ करावी; मात्र पुढील प्रत्येक किमीसाठीची २.०१ रुपये व २.०९ रुपये ही भाडेवाढ वर्षभरासाठी स्थगित करावी.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा