Advertisement

एसी लोकलचे दार न उघडल्याने प्रवासी संतप्त, मोटरमनला केलं केबिनमध्ये बंद

संतप्त प्रवाशांनी मोटरमनला केबिनमध्येच बंद करून ठेवले होते.

एसी लोकलचे दार न उघडल्याने प्रवासी संतप्त, मोटरमनला केलं केबिनमध्ये बंद
SHARES

विरार रेल्वे स्टेशनमध्ये प्रवाशांनी एकच गोंधळ घातला. नालासोपारा स्थानकावर एसी लोकलचे दार उघडले नाही म्हणून प्रवासी संतप्त झाले.

संतप्त प्रवाशांनी मोटरमनला केबिनमध्येच बंद करून ठेवले होते. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मोटरमनची सुटका करण्यात आली आहे.

सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास मुंबईहून विरारकडे जाणारी एसी लोकलचे नालासोपारा रेल्वे स्थानकात दरवाजे न उघडल्याने एकच तारांबळ उडाली. नालासोपारा रेल्वे स्थानकावर लोकल थांबली. यावेळी दरवाजाच उघडला नाही. त्यामुळे नालासोपाराला उतरणाऱ्या प्रवाशांना उतरता आले नाही. त्यामुळे त्यांना विरार स्ठानकावर उतरावे लागले होते. या गोंधळाची रेल्वेनं दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहे.

विरार स्थानकावर प्रवाशांनी मोटरमनला घेरलं आणि जाब विचारला. यावेळी एकच गोंधळ उडाला. प्रवाशांनी मोटरमनला केबिनमध्येच कोंडून टाकले होते. अचानक झालेल्या या गोंधळामुळे मागून येणाऱ्या गाड्या ही रखडल्या होत्या. अखेर रेल्वे पोलीस आणि आरपीएफच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रवाशांची समजूत काढली.

या बाबतची तक्रार काही प्रवाशांनी विरारच्या स्टेशन मास्तरकडे केली आहे. मात्र विरार स्टेशन मास्तरांनी या घटनेचा इन्कार केला असून गार्डने दरवाजे उघडल्याचे सांगितले आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा