Advertisement

प्रवाशांनी तोड गोड करून साजरा केला लोकल सुरू झाल्याचा आनंद

सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळाल्यानं अनेक प्रवाशांनी आनंद व्यक्त केला.

प्रवाशांनी तोड गोड करून साजरा केला लोकल सुरू झाल्याचा आनंद
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा तब्बल १० महिन्यांनंतर सरू झाली. सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळाल्यानं अनेक प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकातील महिला प्रवाशांनी व स्थानकातील इतर प्रवाशांनी तोंड गोड करून लोकल सुरु झाल्याचा आनंद साजरा केला.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात आटोक्यात आला असला तरी अद्यापही करोनाचा धोका कायम आहे. त्यामुळं लोकल सर्वसामान्यांसाठी पुन्हा सुरु होत असली तरी फेस मास्क, सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टनसिंग वापरण्याच्या सूचना वेळोवेळी होत असतात. मात्र, तरीही या सूचनांकडे प्रवासी दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळतंय. सर्वांना लोकल प्रवासांची मुभा देण्यात आली असली तरी लोकल प्रवासासाठी काही वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. तसंच, या वेळेचं बंधन नागरिकांनी पाळलं नाही तर शिक्षा व दंडही आकारण्यात येत आहे.

लोकल सुरु होताच रेल्वे तिकिट खिडक्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. पश्चिम रेल्वेवरील अंधेरी, बोरिवली या तिकीटघरातील सर्व एन्ट्रन्स प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहेत. विनातिकीट प्रवास करु नये यासाठी प्रत्येक स्थानकात टीसीचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा