Advertisement

'या' तारेखेपासून लोकल सुरू होऊ शकते - महापौर

मागील कित्येक महिन्यांपासून मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार याकडं साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

'या' तारेखेपासून लोकल सुरू होऊ शकते - महापौर
SHARES

मागील कित्येक महिन्यांपासून मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार याकडं साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. लोकलबाबत सर्व स्तरावरून प्रश्न विचारले जात असून, लवकरच या प्रश्नांना उत्तर मिळण्याची शक्यता आहे. असं असलं तरी यासंदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी २९ जानेवारी किंवा १ फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे.

'लोकल सुरू होण्यासंदर्भात एक बातमी ऐकली असून, लोकलसंदर्भात चर्चेसाठी महापालिका आयुक्तांनी एक बैठक बोलावली आहे. २९ जानेवारी किंवा १ फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल ट्रेन सुरू झाल्या तरी लोकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळावे, मास्क लावणे, स्वतःची काळजी घेणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आवश्यक आहे.

मागील ३ दिवसांपूर्वी महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी देखील मुंबईल लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याबद्दल माहिती दिली होती. मुंबई एमएमआर रिजनमधील कोरोनाचा आढावा घेऊन शाळा आणि लोकल ट्रेन सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली होती.

मध्य रेल्वेनंही लोकलबाबत स्पष्टता देत सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज आहे. मात्र यासंदर्भात पुढील निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा करत आहोत, अशी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी एका वृत्तसंस्थेला माहिती दिली. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा