Advertisement

सीएसएमटी स्थानकात लोकल धडकली बफरला


सीएसएमटी स्थानकात लोकल धडकली बफरला
SHARES
मध्य रेल्वेच्या (Central Railway) सीएसएमटी स्थानकात एक लोकल (Local) फ्लॅटफॉर्मवरील (Platform) डेडएन्डरवरील बफरला धडकल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, मोटरमनने लोकलवर ताबा मिळवत लोकल रवाना केली.


सीएसएमटी स्थानकातील (CSMT Station) प्लेटफार्म क्रमांक ३ वर अंबरनाथ धीमी लोकल लागली होती. ही गाडी अंबरनाथच्या (Ambarnath) दिशेने रवाना होण्यापूर्वी गाडीचा ताबा मोटरमनने घेतल्यानंतर लोकल सुरू होण्यापूर्वी लोकल (Local) अचानक  पुढे सरकली आणि फ्लॅटफॉर्मवरील डेडएन्डरवरील बफरला धडकली. 

लोकल बफरला धडकल्यामुळे मोठा आवाज झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. नेमके काय झाले, कसे झाले, हे पाहण्यासाठी प्रवाशांची फ्लॅटफॉर्मवर गर्दी झाली होती. अखेर रेल्वे अधिकारी,आरपीएफ आणि रेल्वे पोलिस यांनी आवाहन केल्यानंतर स्थानकातील वर्दळ पूर्वपदावर आली. 

या दुर्घटनेत बफरचे किरकोळ नुकसान झाले. हा प्रकार नेमका कसा घडला, या बाबत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळते.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा