Advertisement

बनावट ओळखपत्राद्वारे प्रवास करणाऱ्यांवर कारवाई

मध्य रेल्वे प्रशासनानं कारवाईचा वेगही वाढवला आहे. उपनगरीय मार्गावर बुधवारी दिवसभरात ३८६ जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून १ लाख ७ हजार ५३० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

बनावट ओळखपत्राद्वारे प्रवास करणाऱ्यांवर कारवाई
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली वाहतूक सेवा 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत पून्हा सुरू करण्यात आली. परंतू, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली. मात्र, त्यानंतर इतर कर्मचाऱ्यांनाही परवानगी देण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्वासाठी अद्याप लोकल सेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यात ओळखपत्र आणि क्यूआर कोडच्या पासवर लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली. मात्र अनेकजण बानावट ओळखपत्राच्या आधारे प्रवास करत असल्याची माहिती मिळताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

महापालिकेच्या कर्मचाऱ्याबरोबर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अन्य विभागांच्या बनावट ओळखपत्रांच्या आधारे लोकलनं प्रवास करणाऱ्यांवर आतापर्यंत २ हजार १०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात, मोलकरणीपासून व्यापारी वर्गाचाही समावेश आहे. अन्य वाहनांचा खर्च परवडणारा नसल्यानं अनेक जण थेट बनावट ओळखपत्राच्या आधारे प्रवास करत असल्याचे समोर येत आहे.

याबाबत माहिती मिळताच मध्य रेल्वे प्रशासनानं कारवाईचा वेगही वाढवला आहे. उपनगरीय मार्गावर बुधवारी दिवसभरात ३८६ जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून १ लाख ७ हजार ५३० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत २ हजार ९४३  विना तिकीट आणि बनावट ओळखपत्र बाळगणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून ११ लाख ७२ हजार २८० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा