Advertisement

बेस्ट समितीची दिवाळी बोनसला मंजुरी

बेस्ट कामगारांच्या बोनसवर गुरुवारच्या बेस्ट समिती बैठकीत शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे उपक्रमातील सुमारे ३४ अधिकारी, कामगारांना बोनसच्या रकमेचा लाभ होणार आहे.

बेस्ट समितीची दिवाळी बोनसला मंजुरी
SHARES

महापालिकेच्या (bmc) कर्मचाऱ्यांनंतर बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस (diwali bonus) जाहीर करण्यात आला. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार १० हजार १०० रुपयांच्या बोनसची घोषणा करण्यात आली.

बेस्ट कामगारांच्या दिवाळी बोनसची रक्कम १० नोव्हेंबरपूर्वी बँक खात्यात जमा करण्याचा प्रयत्न उपक्रमाकडून केला जाणार आहे. या बोनसमुळं उपक्रमावर ३६ कोटी रुपयांचा भार पडणार आहे. बेस्ट कामगारांच्या बोनसवर गुरुवारच्या बेस्ट समिती बैठकीत शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे उपक्रमातील सुमारे ३४ अधिकारी, कामगारांना बोनसच्या रकमेचा लाभ होणार आहे.

बेस्ट उपक्रमासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी १० हजार १०० रुपयांच्या बोनसची घोषणा बुधवारी केली. त्यासंदर्भात बोनसची रक्कम १० नोव्हेंबरपूर्वी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे प्रयत्न राहतील, असे बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी सांगितले. त्याचवेळी, उपक्रमातील अ, ब संवर्गातील अधिकाऱ्यांच्या वेतन कराराला मंजुरी दिली असून त्यापूर्वीच कर्मचाऱ्यांचा वेतन करार झाला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा