Advertisement

सोमवारपासून मुंबईकरांच्या सेवेत मेट्रोच्या आणखी 8 फेऱ्या

मुंबई महा मेट्रोने मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमवारपासून मुंबईकरांच्या सेवेत मेट्रोच्या आणखी 8 फेऱ्या
SHARES

मुंबई महा मेट्रोने मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून मुंबईकरांच्या सेवेत मेट्रोच्या आणखी आठ फेऱ्या दाखल होणार आहेत.

मेट्रो 7 आणि 2A (गुंदवली-दहिसर-अंधेरी पश्चिम) या मार्गावर आणखी आठ फेऱ्या वाढवण्यात येणार आहे.

सोमवारपासून मुंबईकरांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. या आठ फेऱ्या वाढवल्यामुळं आता मेट्रो ७ आणि २ए या मार्गावर एकूण २५३ फेऱ्या होणार आहेत. यापूर्वी २४५ फेऱ्या या मार्गावरुन धावत होत्या.

मेट्रो 7 आणि 2A (गुंदवली-दहिसर-अंधेरी पश्चिम) या मार्गावरील प्रवासी संख्या वाढली आहे. प्रवाशांचा वाढता भार लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे.

गर्दीच्या वेळात मेट्रो फेऱ्यांची वांरवारता ८ मिनिटांऐवजी ७. २९ मिनिटांपर्यंत असेल. म्हणजेच दर ७.२९ मिनिटांला मेट्रो धावणार आहे, असं एमएमओसीएलचे अध्यक्ष श्रीनिवास यांनी म्हटलं आहे.

लाइन ७ मार्ग हा अंधेरी ते दहिसरपर्यंत आहे. तर २ए दहिसर पश्चिम ते डीएन नगरपर्यंत आहे.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा