Advertisement

एक्वा लाईन 3 मध्ये मोबाईल नेटवर्क गायब, प्रवासी त्रस्त

पण मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.

एक्वा लाईन 3 मध्ये मोबाईल नेटवर्क गायब, प्रवासी त्रस्त
SHARES

मुंबईच्या पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गिका असणाऱ्या एक्वा लाइन 3 इथे मोबाईल नेटवर्क नसल्याच्या समस्येचा त्रास प्रवाशांना करावा लागत आहे. 

मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, वाहतूक आणि दळवळणला गती मिळावी यासाठी मुंबईत प्रचंड मोठं मेट्रोचं जाळं उभारलं जात आहे. एक्वा लाइन 3 ही पहिली भूमिगत मार्गिका आहे. या मार्गिकेवर भरपूर सुविधा आहेत. पण मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.

भूमिगत मेट्रो मार्गिकेत नेटवर्क गेल्यानं प्रवाशांना तिकीट काढणं कठीण झालं. नेटवर्कच नसल्यामुळे तिकीट नेमकं काढायचं कसं? असा प्रश्न प्रवाशांना पडला. विशेष म्हणजे नेटवर्क नसल्यामुळे फोन कॉल करणं किंवा मेसेज देखील करता येत नव्हतं. यामुळे प्रवासी वैतागले. अखेर यावेळी मेट्रो प्रशासनाने तोडगा काढला. मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना ऑफलाईन मोडमध्ये मेट्रो अॅपद्वारे तिकीट खरेदी करण्याचा सल्ला दिला.

यावेळी मेट्रो प्रशासनाने स्टेशनवर नोटीस लावली. या नोटीसमधून मेट्रो अॅपद्वारे ऑफलाईन तिकीट खरेदी करा, असं आवाहन मेट्रो प्रशासनाने केलं. यामुळे प्रवाशांना ऑफलाईन तिकीट खरेदी करावं लागलं. या मोठ्या प्रक्रियेमुळे अनेक प्रवासी हे मेट्रो स्थानकावरच अडकून पडले. त्यामुळे त्यांचा मोठा हिरमोड झाला.

मेट्रो प्रशासनाने स्टेशनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी देखील नोटीस लावली. या नोटीसमध्ये प्रवाशांनी त्यांच्या मोबाईलमध्ये मेट्रो अॅपमधून ऑफलाईन तिकीट डाऊनलोड करावे, असं आवाहन करण्यात आलं होतं.



हेही वाचा

मेट्रो 9 विरार आणि वाढवन बंदरापर्यंत वाढवण्याची शक्यता

बेस्टच्या प्रवासी संख्येत मोठी घट

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा