Advertisement

लोकलमुळं मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ

वर्सोवा ते घाटकोपर मेट्रोसेवा सोमवारपासून १ तास आधी सुरू झाली आहे. मर्यादित वेळेत सर्वांसाठी लोकल सुरू झाल्यानंतर मेट्रोनं हा निर्णय घेतला आहे.

लोकलमुळं मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ
SHARES

मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारी एकमेव मेट्रो मुंबईत धावत आहे. त्यामुळे लोकल सेवा सुरू झाल्यानंतर मेट्रोच्या प्रवासी संख्येत ही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मेट्रोमुळं लोकल प्रवाशांना आधार मिळत आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली लोकल सेवा सुरू झाल्यानंतर मेट्रोनं ही आपल्या वेळेच बदल केले आहेत. वर्सोवा ते घाटकोपर मेट्रोसेवा सोमवारपासून १ तास आधी सुरू झाली आहे. मर्यादित वेळेत सर्वांसाठी लोकल सुरू झाल्यानंतर मेट्रोनं हा निर्णय घेतला आहे.

सोमवारपासून वर्सोवा येथून घाटकोपरसाठी पहिली मेट्रो सकाळी ६.५० वाजता सूटली. तसंच, घाटकोपरहून वर्सोवासाठी पहिली मेट्रो सकाळी ७.१५ ला सुटली. शेवटच्या मेट्रो वेळामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वर्सोवा-घाटकोपर शेवटची मेट्रो गाडी रात्री ९.५०ला तर घाटकोपरहून शेवटची मेट्रो १०.१५ला सुटेल. यापूर्वी वर्सोवा-घाटकोपर पहिली मेट्रो ७.५०ला रवाना होत होती.

मेट्रो आणि रेल्वे स्थानकांतील गर्दी नियोजनासाठी १ फेब्रुवारीपासून अंधेरी आणि घाटकोपर रेल्वे स्थानक ते मेट्रो स्थानक असा पादचारी पुलाचा मार्ग खुला करण्यात येणार आहे. मेट्रो स्थानकावरून अंधेरी पश्चिमेला जाणारा मार्गही खुला करण्यात आला आहे.

मेट्रो १वर सध्या दिवसाला २३० फेऱ्या होतात. दर ६ ते ८ मिनिटांनी मेट्रो प्रवासासाठी उपलब्ध होते. लॉकडाउन काळात बंद असलेली मेट्रोसेवा १९ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली. सध्या रोज ८० हजार प्रवासी मेट्रोतून प्रवास करत आहेत. लोकल सुरू झाल्यानंतर हा आकडा लाखांपार जाण्याची शक्यता आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा