Advertisement

मोनोरेल तब्बल ७ महिन्यानंतर रुळावर

चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मार्गावरील मोनो रेल्वेसेवा सुरू झाली असून, र्निजतुकीकरण, तापमान तपासणीसाठी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

मोनोरेल तब्बल ७ महिन्यानंतर रुळावर
SHARES

कोरोनामुळं मागील ७ महिन्यांपासून बंद असलेली मोनोरेल (mumbai monorail) अखेर रविवार रुळावर आली. मोनोच्या प्रवाशांसाठी (passenger) ही आनंदाची बातमी असली तरी, कोरोनाच्या भीतीमुळं पहिल्याच दिवशी मोनोरेलला प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळाल्याची माहिती समोर येत आहे. चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मार्गावरील मोनो रेल्वेसेवा सुरू झाली असून, र्निजतुकीकरण, तापमान तपासणीसाठी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा (mumbai local) केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असल्याने मोनोसेवेचा उपयोग पहिल्या दिवशी काही प्रवाशांनी केला. तर २ जणांनी केवळ भ्रमंतीसाठी हे माध्यम निवडल्याची माहिती मिळते. मोनोसेवेवर रेल्वेगाड्याची कमतरता असून, सध्या केवळ ५ गाड्या कार्यरत आहेत. त्यापैकी एकावेळी २  गाड्या धावणार असून, १ गाडी आयत्या वेळी लगेचच कार्यरत होण्यासाठी तयारीत असणार आहे.

कोरोनामुळं (corona) लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं (lockdown) आता केवळ १२० प्रवाशांना प्रवासाची परवानगी असणार आहे. मात्र त्याआधी एका फेरीत ५८२ प्रवासी प्रवास करत होते.

मोनो स्थानकात प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी केवळ एकच मार्ग खुला ठेवण्यात आला असून, तेथेच तापमान तपासणी आणि हातांच्या र्निजतुकीकरणाची सुविधा आहे. सर्व स्थानकांत, तसेच रेल्वेगाडीत प्रवाशांचा स्पर्श होईल अशा ठिकाणी सातत्याने र्निजतुकीकरण करण्यासाठी कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. तसेच रेल्वेगाडीतदेखील गर्दी नियंत्रण तसेच हवा खेळती राहण्याकरिता झडप उघडझाक करण्यासाठी एक कर्मचारी कार्यरत आहे.

प्रवासादरम्यान प्रवाशांनी घ्यावी काळजी

  • मास्क आणि तापमान तपासणीनंतरच प्रवेश.
  • प्लास्टिक टोकन बंद, कागदी तिकिटाचा वापर.
  • स्पर्शविरहित क्यूआर कोड तिकीट यंत्रणा बुधवारपासून उपलब्ध.
  • ४८ प्रवासी बसून, ७२ प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्यास मुभा.
  • चेंबूर आणि संत गाडगे महाराज चौक स्थानकात तीन मिनिटांचा थांबा.
  • सकाळी ७.०३ ते ११.२४ आणि दुपारी ४.०३ ते रात्री ९.२४ या वेळेत कार्यरत. प्रतिसादानुसार वेळ वाढवली जाईल.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा