Advertisement

एसटी महामंडळ 'या' तारखेपासून सुरू करणार 'स्लीपर बसेस

बहुतांश बसेस मुंबई-कोकण मार्गावर सुरू करण्यात येणार आहेत.

एसटी महामंडळ 'या' तारखेपासून सुरू करणार 'स्लीपर बसेस
SHARES

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एप्रिल 2023 पर्यंत, 50 बिगर वातानुकूलित पूर्णपणे स्लीपर बसेस (Sleeper Bus) सुरू करण्याची योजना आखत आहे. यातील बहुतांश बसेस मुंबई-कोकण मार्गावर सुरू करण्यात येणार आहेत.

बसेस एकूण खर्चाच्या कराराच्या आधारावर सुरू केल्या जातील, म्हणजे भाडे एमएसआरटीसी प्राधिकरणाद्वारे वसूल केले जाईल. कंत्राटदार चालकांना सेवा पुरवेल आणि प्राधिकरण कंत्राटदारांना सेवा देण्यासाठी ठराविक रक्कम देईल.

प्रवाशांची संख्या आणि नोकरदार वर्गातील लोकांची सोय लक्षात घेऊन यापैकी बहुतांश बसेस संध्याकाळी सुटतील, असे एमएसआरटीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

सध्या, महामंडळामार्फत राज्यभरात सुमारे 150 नॉन-एसी सीटर/स्लीपर बसेस, ज्यांना सेमी-स्लीपर बस म्हणूनही ओळखले जाते, चालविल्या जात आहेत. या सेमी-स्लीपर बसमध्ये 30 पुशबॅक सीट आणि 15 स्लीपर बर्थ आहेत. नवीन बसेसमध्ये सर्वच्या सर्व 40 स्लीपर बर्थ असतील.

या बसेसमध्ये रीडिंग लॅम्प, नाईट लॅम्प, चार्जिंग पॉइंट, पंखे आणि दोन मोठे स्टोरेज कंपार्टमेंट यासारख्या सुविधा असतील. बसेसमध्ये अग्निसुरक्षा उपाय देखील आहेत. पुढील 45 दिवसांत एक प्रोटोटाइप बस तयार होण्याची शक्यता आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, या बसेस रात्रीच्या वेळी वाहतुकीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी (सामान्यत: रात्रीच्या रहदारीचे प्रमाण कमी असते) तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्याचा विचार करत आहोत. नोकरदार वर्गातील लोकांची सोय लक्षात घेऊन या गाड्यांचे वेळापत्रक तयार केले जाणार आहे.

या योजनेबद्दल एमएसआरटीसीच्या ऑपरेशन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ते राज्यातील तालुके आणि गावे थेट आर्थिक राजधानीशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या, लोकांना एकतर रेल्वे किंवा खाजगी ऑपरेटरद्वारे चालवल्या जाणार्‍या बसने प्रवास करावा लागतो. हे पर्याय थेट गावांशी जोडले जात नाहीत. मात्र आता एसटी महामंडळ लोकांच्या याच समस्येचे निराकरण करणार आहे. MSRTC सध्या राज्यभरात सुमारे 16,500 बसेस चालवते. ही सेवा दररोज सुमारे 70 लाख प्रवाशांची सेवा करते.



हेही वाचा

लवकरच बंद होणार ठाणे आणि बोरिवलीहून पुण्याला जाणाऱ्या शिवनेरी बसेस, पण...

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा