Advertisement

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टँकर पलटला, मुंबईकडे जाणारी लेन बंद

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा बोगद्याजवळ मुंबईकडे दुधाची वाहतूक करणारा भरधाव टँकर पलटल्यानं अपघात झाला आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टँकर पलटला, मुंबईकडे जाणारी लेन बंद
SHARES

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा बोगद्याजवळ मुंबईकडे दुधाची वाहतूक करणारा भरधाव टँकर पलटल्यानं अपघात झाला आहे. अपघातादरम्यान टँकरची गती जास्त होती. त्यामुळे हा टँकर जवळपास ५० फूट फरपटत पुढे गेला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.

या टँकरची इतर कुठल्याही वाहनाला धडक लागली नसल्याने महामार्गावरील मोठी दुर्घटना टळली आहे. परंतु दुर्दैवाने टँकरमधील एका व्यक्तीने अपघातात आपला जीव गमावला. टँकरमध्ये अडकलेला मृतदेह चालक किंवा क्लिनरचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

अपघातग्रस्त टँकर महामार्गावरील मिडल लाईनवर आडवा झाला असल्याने मुंबईकडे जाणारी एक लेन सध्या बंद झाली आहे. महामार्ग पोलीस घटनास्थळावर दाखल झाले असून एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सर्वतोपरीनं प्रयत्न सुरू आहेत. काही वेळात याठिकाणी अवजड क्रेनच्या सहाय्याने पलटलेला टँकर महामार्गावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग पोलिसांकडून देण्यात आली आहे.



हेही वाचा

कल्याण : सोसायटीत भीषण आग, घर जळून खाक

साकिनाका परिसरातील झोपडपट्टींना भीषण आग

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा