Advertisement

साकिनाका परिसरातील झोपडपट्टींना भीषण आग

अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचं काम करत आहेत.

साकिनाका परिसरातील झोपडपट्टींना भीषण आग
SHARES

मुंबईच्या साकिनाका परिसरात सकाळी ९० फुट रोडवरील झोपड्यांना आग लागली. खाडी नंबर ३ इथं झोपड्यांना भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचं काम करत आहेत. ही आग ३ नंबर खाडीजवळ साकीनाकाच्या झोपड्यांमध्ये लागली आहे.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गरीब आणि मजूर राहतात आणि इतर कामगार लोक राहतात. सध्या कोणत्याही प्रकारची जीवतहानी झाल्याची माहिती नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत.

जर आग जास्त पसरली तर मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. या वस्तीमध्ये कमी जागेत जास्त लोक राहतात. यामुळे आग पसरु नये यासाठी अग्निशमन दलाकडून पूर्ण प्रयत्न केले जात आहेत.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा