Advertisement

६९५ मुजोर रिक्षाचालकांचे मीटर आरटीओने घेतले ताब्यात

भाडे नाकारण्याच्या तक्रारींची संख्या सर्वात जास्त ९५५ इतकी आहे. तसेत ८४० चालकांना लायसेन्स रद्द करण्याच्या नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. या कारवाईत एकूण ६९५ रिक्षांचे मीटर आरटीओने आतापर्यंत ताब्यात घेतले आहेत.

६९५ मुजोर रिक्षाचालकांचे मीटर आरटीओने घेतले ताब्यात
SHARES

मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या  बेशिस्त आणि असभ्य वर्तवणुकीच्या वाढलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने ६९५ रिक्षांचे मीटर ताब्यात घेतले आहे. सहा महिन्यात आरटीओकडे मुंबई शहरात एकूण ८ हजार ५० तक्रारी नोंदवण्यात आलेल्या होत्या. त्यापैकी भाडे नाकारण्याच्या तक्रारींची संख्या सर्वात जास्त ९५५ इतकी आहे. तसेत ८४० चालकांना लायसेन्स रद्द करण्याच्या नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.  या कारवाईत एकूण ६९५ रिक्षांचे मीटर आरटीओने आतापर्यंत ताब्यात घेतले आहेत.

वाहतूक कोंडीत भर घालणाऱ्या, प्रवाशांना मारहाण करणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांविरोधातील वाढलेल्या तक्रारींची गंभीर दखल आरटीओने घेतली आहे. शहरातील ताडदेव, अंधेरी, बोरिवली आणि वडाळा आरटीओमार्फत ही कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईत भंगारात काढलेल्या रिक्षा या पुन्हा रस्त्यावर धावत असल्याचेही दिसून आले आहे. तर जादा भाडे घेणे, बॅच-लायसन्स शिवाय गाडी चालवणे, या सारख्या एकूण ८०५० तक्रारी मागील सहा महिन्यात आरटीओजवळ नागरिकांनी केल्या आहेत.  

आरटीओ अशा मुजोर रिक्षाचालकांना लायसन्स रद्द करण्याच्या नोटीस पाठवते; परंतु असे अनेक रिक्षाचालक आहेत, जे लायसन्स आणि बॅच नसतानादेखील रिक्षा चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आरटीओने लायसन्स रद्द करण्याच्या नोटिसा दिलेल्या रिक्षांचे मीटर जप्त करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे मीटर जप्त झालेल्या रिक्षा रस्त्यावर धावू शकत नाहीत. अशा ६९५ रिक्षांचे मीटर आरटीओने ताब्यात घेतले आहेत. भाडे नाकारण्याच्या सर्वाधिक ४४७ तक्रारी वडाळा आरटीओमध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत. .


आकडेवारी

  • एकूण तक्रारी - ८०५०
  • भाडे नाकारणे- ९५५
  • जादा भाडे घेणे - २०
  • लायसन्स रद्द करण्याची नोटीस- ८४०
  • लायसन्स रद्द - ५५०
  • बॅज-लायसन्सशिवास रिक्षा चालवणे-६४३४
  • परवाना निलंबित -८९९
  • रिक्षा-टॅक्सी जप्त - १५८
  • ताब्यात घेतलेले रिक्षाचे मीटर - ६९५
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा